गैरव्यवहार झाकण्यासाठी पालिका मुख्यालयास आग लावण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 12:11 AM2020-02-27T00:11:39+5:302020-02-27T00:14:07+5:30

स्फोटक फायलींचा साठा; संरक्षण देण्याची भाजपची मागणी

Fear of setting fire in thane municipal headquarters to cover fraud | गैरव्यवहार झाकण्यासाठी पालिका मुख्यालयास आग लावण्याची भीती

गैरव्यवहार झाकण्यासाठी पालिका मुख्यालयास आग लावण्याची भीती

Next

ठाणे : काही वर्षांपूर्वी मंत्रालयाला आग लागून अनेक फायलींची राख झाली होती. मुंबईतील जीएसटी भवनलाही नुकतेच संशयास्पद आगीने वेढले. आता ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागातही अनेक स्फोटक गैरव्यवहारांच्या फायलींचा साठा असल्याचा गौप्यस्फोट करून संबंधितांकडून शहर विकास विभागास आग लावण्याची भीती भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी व्यक्त केली आहे. यामुळे हे संकट टाळण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

महापालिकेच्या शहर विकास विभागाने गेल्या काही वर्षांत हजारो इमारतींचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्यात बिल्डरांना सीसी, पार्ट ओसी, ओसी आणि टीडीआर दिाल्याची अनेक कागदपत्रे आहेत. यातील काही वादग्रस्त प्रस्तावांबाबत अनेक तक्रारीही सरकारदरबारी दाखल आहेत. तर, काहींची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशीही सुरू आहे. काही व्यवहारांसंदर्भात उच्च न्यायालयाकडे जनहित याचिकाही दाखल आहेत. या सर्व फायलींचा ‘स्फोटक’ साठा सध्या शहर विकास विभागात आहे, याकडे पवार यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

अधिकाऱ्यांतील दुफळी ठरू शकते कारण
ठाणे महापालिकेकडून स्मार्ट सिटी प्रकल्पात डीजी ठाणेचा गवगवा केला जातो. मात्र, शहर विकास विभागातील सर्व व्यवहार डिजिटल केलेले नाहीत. सर्व व्यवहार कागदी फायलींवरच आहे.
मात्र, कधी काळी वादग्रस्त प्रकरणातील फाइल उघडल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तीनतेरा वाजू शकतील. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अधिकाºयांमधील वाद व दुफळी व्हॉट्सअ‍ॅप चर्चेच्या निमित्ताने उघड झाली.
या पार्श्वभूमीवर व बदलती प्रशासकीय स्थिती लक्षात घेऊन शहर विकास विभागाला आग लागल्याची भीती वाटते. तीपासून संरक्षण होण्यासाठी विभागातील इलेक्ट्रिक व्यवस्था, अग्निशामक उपकरणे आदींसह पर्यायी व्यवस्थेची तपासणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुख्यालय इमारत ठरू शकते पापाची धनी
महापालिका मुख्यालयाच्या इमारतीला ३३ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. ठाणेकरांच्या दुर्दैवाने आगीची घटना घडल्यास ही इमारतच पापाची धनी ठरू नये. महापालिकेत नगरसेवक म्हणून मी अनेक वर्षे काम केले आहे.
केवळ माझ्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी पत्र लिहून शहर विकास विभागाचे संरक्षण करण्याची विनंती केली असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी या पत्राद्वारे प्रशासनाला लगावला आहे.

Web Title: Fear of setting fire in thane municipal headquarters to cover fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.