ठाण्यातील वाघेला चहा दुकानावर एफडीएचा छापा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 10:26 PM2018-12-08T22:26:16+5:302018-12-08T22:27:12+5:30

ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील वाघेला चहा या दुकानातील चहा पत्तीमध्ये भेसळ असल्याच्या संशयावरून ठाणे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए)  पथकाने शनिवारी रात्री छापा टाकला.

FDA raids on waghela tea shop in Thane | ठाण्यातील वाघेला चहा दुकानावर एफडीएचा छापा 

ठाण्यातील वाघेला चहा दुकानावर एफडीएचा छापा 

googlenewsNext

ठाणे:  ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील वाघेला चहा या दुकानातील चहा पत्तीमध्ये भेसळ असल्याच्या संशयावरून ठाणे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए)  पथकाने शनिवारी रात्री छापा टाकला. दुकानातील संशयास्पद साठ्यातील नमुने ताब्यात घेऊन माल सील केला.

तसेच, नमुने प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती एफडीए अधिकारी धनश्री ढोणे यांनी माध्यमांकडे दिली. पथकाने शनिवारी रात्री टाकलेल्या छाप्यात दुकानातून 370 किलो सुट्टा गोणीत असलेला माल आणि 1 हजार 80 पॅकिंग केलेली पाकिटे सील केली.

सील केलेला मुद्देमालाची किंमत सुमारे 2 लाख असल्याची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: FDA raids on waghela tea shop in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे