शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पुत्रप्रेमासाठी दुसऱ्या पक्षातील नेत्यांसमोर वडिलांचा 'मुजरा' होतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 18:15 IST

ठाणे - मागील 40-40 वर्षे एका पक्षाशी निष्ठा ठेवल्यानंतर केवळ पुत्र प्रेमासाठी आणि त्याच्या स्वार्थासाठी नेते दुसऱ्या पक्षात जात ...

ठाणे - मागील 40-40 वर्षे एका पक्षाशी निष्ठा ठेवल्यानंतर केवळ पुत्र प्रेमासाठी आणि त्याच्या स्वार्थासाठी नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत. परंतु, जात असतांना दुसऱ्या पक्षाच्या काल परवा झालेल्या नेत्यांपुढे मुजरा करावा लागतो, ही अतिशय दुर्देवाची गोष्ट असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्यामुळे आम्ही वंशाच्या दिवा नसलो तरी आम्ही स्वाभिमानी असून आम्ही आमच्या वडिलांना आमच्या स्वार्थासाठी कुणापुढेही मुजरा करायला लावत नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीतून भाजप व शिवसेनेत जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांना टोला लगावला.

ठाण्यात गुरुवारी संवाद दौऱ्यासाठी सुळे आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही खंत व्यक्त केली. जे जात आहेत, त्यांच्यावर देखील दबाव आणला जात असून कोणाची बॅंक घोटाळे, कारखाने, तर कोणाची चौकशी लावू म्हणून पक्षात घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जे जात असतील त्यांच्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत. तटकरे, भास्कर जाधव आदी मंडळीसुद्धा राष्ट्रवादी सोडत असल्याचा प्रश्न त्यांना केला असता, जी नावे घेतली जात आहेत, त्या नावांना मोठं कोणी केलं. पक्षानेच त्यांना मोठं केलं असून त्यामुळेच ते आज मोठे झाले आहेत, त्यामुळे संघटनेपुढे नाव हे छोटेस असते असेही त्यांनी सांगितले. गणेश नाईक यांच्याबाबतही त्यांना छेडले असता, माझ्या माहितीनुसार सध्या तरी ते राष्ट्रवादीतच असल्याचे सांगत त्यांनी यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. आज मुख्यमंत्र्यांचा दौरा जालन्यात होता, मात्र त्याठिकाणच्याच एका मुलीवर बलात्कार झाला असून त्यावर साधे भाष्यही मुख्यमंत्र्यांनी केले नाही, ही अतिशय खेदाची बाब असल्याचे सुळेंनी म्हटले. सध्याचे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरुन समजत आहे. राज्यात किंवा देशात महिला सुरक्षित नाहीत, त्यांच्यावरील अत्याचार वाढतच आहेत. असे असतांना त्यांना सुरक्षितता देण्याऐवजी भाजप सरकार केवळ राजकारण करत असल्याची टिकाही त्यांनी केली. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता मुंबईत मोर्चा काढला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी चर्चा केली असता, ठाण्यातील वाहतूक कोंडी किती भंयकर आहे, याची जाणीव झाली आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करण्यासाठी पावले उचलली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु अवघ्या साडेतीन किमीचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना दोन ठिकाणी टोल द्यावा लागत आहे. युती सरकार जेव्हा सत्तेत येणार होते, तेव्हा त्यांनी टोलमुक्तीचा वादा केला होता. परंतु, आजही टोलमुक्ती झाली नसल्याने याविरोधात आंदोलन पुकारले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

काश्मीरमधील 370 कलम हटविल्यानंतर काश्मिरमध्ये सध्या काय सुरू आहे, हे कोणालाच माहित नाही. तेथील नेत्यांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र, त्यांचे फोन लागत नाहीत, त्यामुळे ही दडपशाहीच आहे, असे म्हणणे योग्य ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंदी नाही, असे सरकार म्हणत आहे, मग बेरोजगारांना नोकरी का मिळत नाही, उद्योगधंदे का बंद होत आहेत, असा सवाल उपस्थित करुन ही बेरोजगारी नसून सुशिक्षित बेरोजगारी असल्याचेही त्या म्हणाल्या.

गटनेते हणमंत जगदाळे यांनी गटनेतेपदाचा राजीनामा का दिला, याविषयाची माहिती घेतली जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा करुन यामागे नेमकी काय कारणे आहेत, हे जाणून घेतले जाईल. तसेच त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाthaneठाणेBJPभाजपा