उधारीचा वडापाव दिला नाही, तरुणावर जीवघेणा हल्ला; अंबरनाथ पश्चिम माऊली कृपा हॉटेल मधील घटना 

By पंकज पाटील | Updated: October 3, 2023 19:18 IST2023-10-03T19:14:15+5:302023-10-03T19:18:13+5:30

या गोष्टीचा राग आकाशला आला आणि आकाश आणि शरदमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर जवळ पडलेल्या सिमेंटचा ब्लॉक आकाशने उचलला आणि शरद याच्या डोक्यात टाकला.

Fatal attack on young man in Ambernath Paschim Mauli Kripa Hotel | उधारीचा वडापाव दिला नाही, तरुणावर जीवघेणा हल्ला; अंबरनाथ पश्चिम माऊली कृपा हॉटेल मधील घटना 

उधारीचा वडापाव दिला नाही, तरुणावर जीवघेणा हल्ला; अंबरनाथ पश्चिम माऊली कृपा हॉटेल मधील घटना 

अंबरनाथ : उधारीचा वडापाव न दिल्याने एका हॉटेल कर्मच्याऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. 

अंबरनाथ पश्चिम फॉरेस्ट नाका परिसरात माऊली कृपा नावाचं हॉटेल असून या हॉटेलमध्ये शरद अवारे हा कर्मचारी काम करत होता. यावेळी आकाश हा तरुण या हॉटेलमध्ये आला आणि त्याने शरद याच्याकडे उधारीवर वडापाव मागितला. मात्र शरदने मागील उधारी तू दिली नाही आणि हॉटेल सुद्धा बंद झालाय त्यामुळे वडापाव नाही आहे असे सांगितले. या गोष्टीचा राग आकाशला आला आणि आकाश आणि शरदमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर जवळ पडलेल्या सिमेंटचा ब्लॉक आकाशने उचलला आणि शरद याच्या डोक्यात टाकला. 

या हल्यात शरद हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपीं आकाशचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.
 

Web Title: Fatal attack on young man in Ambernath Paschim Mauli Kripa Hotel