ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे उपोषण
By अजित मांडके | Updated: May 2, 2023 16:54 IST2023-05-02T16:54:15+5:302023-05-02T16:54:36+5:30
शरद पवार यांच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याच्या घोषणेनंतर ठाण्यातही पडसाद उमटले.

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे उपोषण
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर व्यथित झालेल्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात केली.
शरद पवार यांच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याच्या घोषणेनंतर ठाण्यातही पडसाद उमटले. ठाण्यातील कार्यकर्त्यांनी पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी चक्क आत्मक्लेश आंदोलनाचा मार्ग अनुसरला.
पक्ष कार्यालयासमोर अनेक कार्यकर्ते चक्क उपोषणाला बसले. या उपोषणात महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, शहर सरचिटणीस रवींद्र पालव, आदी सहभागी झाले होते.