शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

किसान सभेच्या लाँग मार्चला तिसऱ्या दिवशीही जोरदार प्रतिसाद !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2018 6:31 PM

शेतकरी कर्जमुक्ती, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, शेतीमालाचे भाव व इतर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी 6 मार्च रोजी नाशिक येथून काढण्यात आलेल्या लाँग मार्चने आज तिसऱ्या दिवशी कसारा घाटातून खाली उतरत मुंबईकडे कूच केले.

कसारा (शहापूर) : शेतकरी कर्जमुक्ती, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, शेतीमालाचे भाव व इतर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी 6 मार्च रोजी नाशिक येथून काढण्यात आलेल्या लाँग मार्चने आज तिसऱ्या दिवशी कसारा घाटातून खाली उतरत मुंबईकडे कूच केले. तिसऱ्या दिवशी परिसरातील शेतकरी लाँग मार्चमध्ये सामील झाल्याने नाशिक येथून सामील झालेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. नाशिक येथून निघालेल्या लाँग मार्चचे राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या गावांच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत होत आहे. गावोगावचे शेतकरी लाँग मार्च मधील शेतकऱ्यांना पाणी पुरवून व फुले देऊन आपला पाठिंबा व्यक्त करत आहेत.

लाँग मार्च मध्ये सामील झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या गावातून तांदूळ व शिधा सोबत आणला आहे. मंगळवारी रात्री रायगड नगर येथील वालदेवी नदी जवळ श्तकऱ्यांनी मुक्काम ठोकला होता. सोबत आणलेल्या भाकरी शेतकऱ्यांनी येथे आपसात वाटून खाल्ल्या. किमान 30 हजार शेतकऱ्यांना रोडवर व आजूबाजूच्या शेतात झोपून मुक्कामाची पहिली रात्र काढली. सकाळी पुन्हा 18 किलोमीटर अंतर पायी चालून लाँग मार्च खंबाळे ता. इगतपुरी येथे पोहचला. येथील तळ्यावर आपल्या बरोबर आणलेला तांदूळ उकडून शेतकऱ्यांनी भोजन केले. बुधवारी रात्री घाटनदेवी ता. इगतपुरी येथे मुक्काम केला. वाडा, शहापूर, ठाणे, पालघर, विक्रमगड येथील हजारो शेतकरी 8 मार्चला आटगाव ता. शहापूर येथे लाँग मार्चमध्ये सामील झाले.  लाँग मार्चच्या पुढे पारंपरिक वाद्ये वाजवण्यात येत आहेत. चळवळीची गाणी गायली जात आहे. घोषणांनी वातावरण दुमदुमून निघत आहे.  किसान सभेचे डॉ अशोक ढवळे, आ.जे.पी.गावीत, विजू कृष्णन, किसन गुजर, डॉ अजित नवले, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, सुभाष चौधरी, सिद्धप्पा  कलशेट्टी, बारक्या मांगात, रडका कलांगडा आदी नियोजन व नेतृत्व करत आहेत. महिला शेतकरीही मोठ्या संख्येने सामील झाले आहेत.

प्रत्यक्ष सामील होऊ न शकलेल्या शेतकऱयांनी लॉंग मार्चच्या समर्थनार्थ आपल्या जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयावर निदर्शने करून, निवेदने देऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन किसान सभेने केले आहे.