शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अंधश्रद्धेमुळे दुर्गम भाग कोरोना लसीकरणापासून दूर, लसीपेक्षा घरगुती काढ्यावरच अधिक विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 09:49 IST

कोराेनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, त्यामुळे शहरी भागात लसीकरणासाठी रोज लांबच लांब रांगा लागत आहेत. मात्र, दुसरीकडे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील आदिवासी, कातकरी समाज लसीकरणापासून आजही कोसो दूर आहे.

जनार्दन भेरे -कोराेनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, त्यामुळे शहरी भागात लसीकरणासाठी रोज लांबच लांब रांगा लागत आहेत. मात्र, दुसरीकडे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील आदिवासी, कातकरी समाज लसीकरणापासून आजही कोसो दूर आहे. हा समाज अशिक्षित असल्याने त्यांच्यावर अंधश्रद्धेचा पगडा अद्याप कायम आहे. त्यामुळे या समाजाला लसीकरण केंद्रापर्यंत आणायचे झाल्यास, त्यांच्यातील अंधश्रद्धेला दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. लसीकरणाच्या दूरगामी फायद्यांबाबत त्यांच्यात जनजागृती करणे अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी काही ठिकाणी प्रयत्नही सुरू झाले आहेत. या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी गावे, पाडे येथे लसीकरणाची नेमकी परिस्थिती काय आहे, याचा ‘लोकमत’ने घेतलेला हा आढावा.

भातसानगर : शहरी भागात कोरोनाप्रतिबंधक लस मिळवण्यासाठी नागरिकांची वणवण होताना सध्या दिसत आहे. लसीकरण केव्हा होणार याची चिंता शहरवासीयांना लागलेली असताना ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण, खास करुन आदिवासी, कातकरी समाज तर लसीकरणापासून कोसो दूर आहेत. हा समाज लस घेण्यासाठी पुढेच आलेला नाही. त्यामुळे समाजातील एक वर्ग लस मिळण्यासाठी धडपडत असून दुसरा वर्ग असा आहे, की ज्याला लसीपेक्षा आयुर्वेदिक काढा आणि वनाैषधींवरच अधिक विश्वास आहे.ठाणे जिल्ह्यातील खास करुन शहापूरसारख्या आदिवासीबहुल तालुक्यात अनेक गावांच्या आसपास कातकरी समाज राहतो. बिरवाडी, भातसानगर, लाहे, साजिवली, सवरशेत, सरलंबे,सावर्षेत, चरपोली, दाहीगाव, पळशिन,कुकांब, रातांधळे या सारख्या निवडक भागातच हा समाज राहतो. अगदी बोटावर मोजण्याइतकी गावागावात त्यांची लोकसंख्या आहे. यांच्यामध्ये कुणीही आजारी झाल्यास प्रथम भगत यांच्याकडे वळणारा असल्याने जगातील विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्याशी त्यांचा काडीमात्र संबंध नाही. केवळ बाबा सांगेल त्यानुसारच सर्व काही करण्याचा त्यांचा अट्टाहास. त्यामुळे सध्या जगात पसरलेल्या या कोरोनाबद्दल त्यांच्या मनात ना भय ना भीती अशीच त्यांची परिस्थिती आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज जग कोरोना महामारीशी लढताना हतबल झाल्याचे पाहावयास मिळत असतानाही या समाजात काहीही बदल झालेला दिसत नाही.तालुक्यात ७ ते ८ हजार लोकसंख्या असलेल्या एकाही व्यक्तीने आजपर्यंत लस घेतलेली नाही. बिरवाडीसारख्या सुशिक्षित गावाजवळ मोठ्या संख्येने हा समाज राहत असूनही कुणीही लसीकरण करुन घेतले नाही हे विशेष. आम्हाला काहीही होत नाही निसर्ग आमचा मायबाप आहे. आम्ही सकाळी सूर्याच्या उन्हात असतो, अशी त्यांची भूमिका असून, ही लस घेतल्यानंतर माणूस जगत नाही अशी त्यांना भीती वाटते. लसीमुळे ताप येतो म्हणजे ती तापाची सुरुवात आहे, असाही त्यांचा गैरसमज आहे. आम्हाला कोरोना झालाच नाही मग आम्ही लस का घ्यायची अशीही त्यांची भूमिका आहे. आमच्या आहारावर आमचा भरवसा आहे. आम्ही काम करतो, घाम गाळतो त्यामुळे आम्ही त्यापासून दूरच. हा समाज तसा अतिशय भित्रा असा आहे. जर एखादी वाईट घटना घडली तर सर्वांचे तीनतेरा वाजतात. त्यामुळे जर का कुणी कोरोनाबाधित झाला आणि कुणाचा मृत्यू झाला तर यांच्या वाडीत शोधायला माणूस मिळणार नाही. जो तो जंगलात तर कुणी नदीच्या काठी जेथे निवांत जागा मिळेल तिथे जाऊन राहणार अशी यांची अवस्था आहे. त्यासाठी यांच्या वाडीत जाऊन जनजागृती करुन त्यांचे रजिस्ट्रेशन करुन ४५ वर्षांवरील प्रत्येकाचे लसीकरण करुन घेतले पाहिजे. तरच इतर लस घेण्यास तयार होतील. अन्यथा लस घेण्यास कुणी धजावणार नाहीत. अंधश्रद्धेत गुरफटलेला समाज म्हणून याची ओळख आहे. शिक्षणापासून दूर, लवकर लग्न, व्यसनाधिनता, आज जेवढे मिळाले त्याची विल्हेवाट लावा,उद्याची चिंता नाही असा कातकरी जमातीचा एकूणच जीवनक्रम आहे.

लस घेणे म्हणजे पापnआदिवासी लसीपासून दूरच आहेत. त्यांना आपल्या जीवनमानावर पूर्ण विश्वास आहे. ही लस घेणे म्हणजे पाप आहे अशीच त्यांची भूमिका आहे. लस घेतल्याने आजार होतो असा भ्रम त्यांच्यात आहे. nगुळवेल, आंबा, काजू, पेरू यांचा काढा, वनईचा पाला याचे कोवळे बोक, लिंबाड्याचा रस यावरच त्यांचा भर आहे. लसीपेक्षा आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेल्या काढ्यावर त्यांचा विश्वास आहे.

आम्ही सहसा डॉक्टरकडे जात नाहीत. झाडपाल्याचा उपयोग अधिक करतो.त्यामुळे कोरोना लसीकरणावर आमच्या लोकांचा विश्वास नाहीच.त्यामुळे लसीकरण करुन घेत नाही.- दत्ता मुकणे, कातकरी 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याRaigadरायगडdoctorडॉक्टर