शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

N D Studio Fire: 'जोधा अकबर'मधील किल्ल्याचा सेट आगीच्या भक्ष्यस्थानी; नितीन देसाईंच्या एनडी स्टुडिओमध्ये अग्निकल्लोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 14:41 IST

Fire Caught At ND studio : ‘जोधा अकबर’ सेटजवळील फायबर मूर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे ही आग लागली असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

ठळक मुद्दे  आज दुपारी बारा ते सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. ही आग प्रचंड असून, आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोळ या परिसरात पहायला मिळत आहेत.काेराेनामुळे सध्या एनडी स्टुडिओमध्ये चित्रकरण बंद हाेते. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे. 

खोपोली - प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जत रस्त्यावर असलेल्या एनडी स्टुडिओमध्ये जोधा अकबर सेट जवळील फायबर मुर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे आज दुपारी १२ ते १२.१५ च्या सुमारास भीषण आग लागली आहे.शनिवार वाड्याचा सेटही जळाला असल्याची माहिती येत आहे.आर्थिक नुकसान झाले आहे.आग लागण्याचे कारण अद्याप समजले नाही. खालापूर तालुक्यातील हातणोली-चौक येथील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एन.डी. स्टुडिओत आज दुपारी आग लागली आहे. ‘जोधा अकबर’ सेटजवळील फायबर मूर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे ही आग लागली असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

 

आज दुपारी बारा ते सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. ही आग प्रचंड असून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोळ या परिसरात पहायला मिळत आहेत. एनडी स्टुडिओतील जोधा अकबर सेटजवळील फायबर मूर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे ही आग लागली आहे. 

 

घटनास्थळी खालापूरचे तहसिलदार इरेश चप्पलवार, पोलीस निरीक्षक विभूते व संबंधित यंत्रणा दाखल झाले असून, फायर ब्रिगेडच्या 3 गाड्या बोलाविल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत जीवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या आगीत स्टुडिओचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अद्याप समजलेले नाही. दरम्यान, काेराेनामुळे सध्या एनडी स्टुडिओमध्ये चित्रकरण बंद हाेते. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे. 

(Inputs from: नितीन भावे, विजय मांडे )

टॅग्स :fireआगKarjatकर्जतFire Brigadeअग्निशमन दलPoliceपोलिसbollywoodबॉलिवूड