बनावट नोटाप्रकरणी त्रिकुटाला अटक
By Admin | Updated: October 6, 2015 00:29 IST2015-10-06T00:29:15+5:302015-10-06T00:29:15+5:30
शनिवारी हजाराच्या ४०६ बनावट नोटांप्रकरणी ठाण्यात अटक केलेल्या त्रिकुटाला शुक्रवारी ९ आॅक्टोबरपर्यंत कोठडी मिळाली आहे. त्यापैकी एक बांगलादेशी अब्दुल्ला याच्याकडे पासपोर्ट
_ns.jpg)
बनावट नोटाप्रकरणी त्रिकुटाला अटक
ठाणे : शनिवारी हजाराच्या ४०६ बनावट नोटांप्रकरणी ठाण्यात अटक केलेल्या त्रिकुटाला शुक्रवारी ९ आॅक्टोबरपर्यंत कोठडी मिळाली आहे. त्यापैकी एक बांगलादेशी अब्दुल्ला याच्याकडे पासपोर्ट सापडला असून तो भारतात आल्यावर मोटू सोपान मंडल या नावाने वावरत असल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली.
ठाणे, सिडको येथे काही जण भारतीय बनावट नोटा वटविण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार भोसले यांना मिळाली होती. त्यानुसार, ठाणे शहर अमली पदार्थविरोधी पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक पथकाने सापळा रचून बांगलादेशी अब्दुल्ला, मोहंमद खान, नजमुल शेख या त्रिकुटाला ताब्यात घेतले.
त्या वेळी त्यांच्याकडे एक हजारांच्या ४२ बनावट नोटा सापडल्या. तसेच ते तिघे मुंब्य्रात एकाच घरात राहत असल्याने त्यांच्या घरझडतीत ३ लाख ६४ हजारांच्या बनावट नोटा सापडल्या. अशा एकूण एक हजारांच्या ४०६ बनावट नोटा सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अब्दुल्ला हा मुंब्रा, दिवा परिसरात राहत होता. तसेच त्याच्याकडे पासपोर्टसह मोटू मंडल या नावाने आधारकार्ड व पॅनकॉर्ड सापडले आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले. त्या वेळी त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती ठाणे शहर पोलीस जनसंपर्क अधिकारी गजानन काबदुले यांनी दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी करीत आहेत.
(प्रतिनिधी)