मनोगत व्यक्त केले म्हणून हकालपट्टी
By Admin | Updated: February 1, 2017 02:49 IST2017-02-01T02:49:24+5:302017-02-01T02:49:24+5:30
शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील समस्या निरोप समारंभात मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थिनीस, संतापलेल्या अधीक्षिकेने वसतिगृह सोडून जाण्याचा आदेश दिल्याने

मनोगत व्यक्त केले म्हणून हकालपट्टी
- सुरेश काटे, तलासरी
शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील समस्या निरोप समारंभात मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थिनीस, संतापलेल्या अधीक्षिकेने वसतिगृह सोडून जाण्याचा आदेश दिल्याने, वसतिगृहातील दोनशे विद्यार्थिनींनी तहसीलदारांच्या कार्यालयात ठिय्या दिला व अधीक्षिकेच्या मनमानीबाबतचे निवेदन दिले.
आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासकीय मुलींचे वसतिगृह येथे आहे. या वसतिगृहाच्या समस्यांबाबत वसतिगृहाच्या अधीक्षिका आर. एस. भाले यांच्याकडे अनेकदा त्यांनी तक्र ारी केल्या, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी तर वर्षभर आश्रमशाळेला भेटच देत नाहीत व मुलींच्या समस्या विचारात घेत नाहीत, असे मनोगत एका विद्यार्थिनीने व्यक्त करताच, तिला अधीक्षिकेने बाहेरचा रस्ता दाखविल्याने, संतापलेल्या दोनशे विद्यार्थिनींनी तहसीलदाराकडे धाव घेऊन निवेदन दिले व प्रकल्प अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत तहसील कार्यालयातच ठिय्या देणार असे सांगितले. तेव्हा डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाच्या सहायक प्रकल्प अधिकारी राऊत यांनी मुलींच्या मागण्या व समस्यांबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या वेळी वसतिगृहातील अनेक गंभीर बाबी मुलींनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
‘अधीक्षिका वसतिगृहात राहात नाहीत, वर्ष संपत आले, तरी अजून शैक्षणिक पुस्तके दिली नाहीत. टीव्ही, फोन, कॉम्प्युटर बंद आहेत. खेळाचे साहित्य नाही. भोजन खाण्यालायक नसते. पाच महिन्यांपासून निर्वाहभत्ता नाही. आजारी पडल्यास रु ग्णालयात नेले जात नाही,’ या समस्या मांडल्या. यावर आठ दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले. निर्वाहभत्ता, विद्युत बिल, टेलिफोन बिल, हे मंजुरीसाठी प्रकल्पात आले, तर ते आम्ही तत्काळ मंजूर करतो, असे राऊत यांनी सांगितल्याने, सावळागोंधळ समोर आला. अधीक्षिकेचा मनमानी कारभार व समस्यांमुळे विद्यार्थिनी तहसील कार्यालयात गेल्याचे समजताच, तलासरी पंचायत समितीचे सभापती वनशा दुमाडा, पंचायत सदस्य ऊर्मिला शिंगडे, संगीता ओझरे, सुनीता शिंगडे यांनी मुलींची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. वसतिगृहाच्या अधीक्षिका आर. एस. भाले यांची तत्काळ बदली करा, ही मागणी विद्यार्थिनींनी लाऊन धरली.
तलासरीला पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांचा नियमित दौरा होत असतो, तर खासदार चिंतामण वनगा व आमदार पास्कल धनारे हे तलासरीतच असतात. तरीही आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील मुलींच्या समस्यांकडे त्यांचे लक्ष नाही, अशी टीका त्यांच्यावर होत आहे.
- अधीक्षिका वसतिगृहात राहात नाहीत, वर्ष संपत आले, तरी अजून शैक्षणिक पुस्तके दिली नाहीत. टीव्ही, फोन, कॉम्प्युटर बंद आहेत. खेळाचे साहित्य नाही. भोजन खाण्यालायक नसते. पाच महिन्यांपासून निर्वाहभत्ता नाही. आजारी पडल्यास रु ग्णालयात नेले जात नाही, अशा समस्या वसतिगृहातील मुलींनी आंदोलनाच्या वेळेस मांडल्या.