कार्तिकी एकादशीसाठी जादा एसटी

By Admin | Updated: December 4, 2015 00:33 IST2015-12-04T00:33:03+5:302015-12-04T00:33:03+5:30

आळंदी येथे ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्तिकी एकादशीसाठी राज्य परिवहन सेवेच्या ठाणे विभागीय कार्यालयामार्फत ११० जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

Extra ST for Kartiki Ekadashi | कार्तिकी एकादशीसाठी जादा एसटी

कार्तिकी एकादशीसाठी जादा एसटी

ठाणे : आळंदी येथे ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्तिकी एकादशीसाठी राज्य परिवहन सेवेच्या ठाणे विभागीय कार्यालयामार्फत ११० जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. एकत्रित आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे विभागीय नियंत्रक यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ३ डिसेंबर २०१५ पासून या जादा गाड्या सुरू केल्या आहेत. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ठाणे एक आणि दोन, भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड, विठ्ठलवाडी आणि पालघर जिल्ह्यातील वाडा या आठ डेपोंतून प्रत्येकी किमान दोन गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यानुसार, आधी १६ त्यानंतर टप्प्याटप्प्याने या गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. भाविकांनी जादा गाड्यांचे आरक्षण करण्याचे आवाहन एसटीने केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Extra ST for Kartiki Ekadashi