शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

शिक्षणाच्या हक्काखालील ठाणे जिल्ह्यातील प्रतिक्षा यादीमधील ११७३ बालकांच्या शालेय प्रवेशासाठी मुदत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 5:08 PM

RTE : आरटीई कायद्याखाली निवड झालेल्या या बालकांना पहिली ते सीनिअर केजी म्हणजे पूर्व प्राथमिक या वर्गात प्रवेश दिले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाऱ्या व बालकाच्या घराजवळ असलेल्या ६६९ शाळांमध्ये यंदा आरटीई म्हणजे शिक्षणाचा हक्क कायद्याखाली २५ टक्के प्रवेश दिले जात आहेत. आता प्रतिक्षा यादीतील एक हजार ८९४ विद्यार्थ्यांची या प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्यांना २३ आँक्टोबरपर्यंत दिलेल्या शाळेत प्रवेश घ्यायचा होता. मात्र फक्त ७१८ बालकांनी या मुदतीत प्रवेश घेतले. तर उर्वरित एक हजार १७३ बालकांना २९ आँक्टोंबरपर्यंत प्रवेश घेण्याची वाढीव मुदत देण्यात आली आहे. 

          या आरटीई कायद्याखाली निवड झालेल्या या बालकांना पहिली ते सीनिअर केजी म्हणजे पूर्व प्राथमिक या वर्गात प्रवेश दिले जात आहेत. लाँटरी सोडत द्वारे निवड झालेल्या नऊ हजार ३२६ बालकांपैकी दिलेल्या मुदतीत पाच हजार ६७७ बालकांनी प्रवेश घेतले आहेत. यानंतर आता प्रतिक्षा यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीनंतर ही आता वाढीव मुदत देऊन प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांना प्रवेश घेण्याची शाळा एसएमएसद्वारे कळवण्यात येणार आहे.   

      या शालेय प्रवेशासाठी संधी देऊन लाँटरी सोडतमधील तीन हजार ४९७ बालकांनी दिलेल्या शाळेत जाऊन प्रवेश घेतलेले नाही. आताही प्रतिक्षा यादीतील एक हजार १७३ बालकांनी प्रवेश घेतलेला नाही. या बालकांच्या पालकांनी तत्काळ शाळेत जाऊन प्रवेश घेणे आवश्यक आहे. पालकांनी एसएमएसची वाट न  पाहता पालकांनी पोर्टलवर जाऊन प्रवेशाचा दिनांक येथे प्रवेश अर्जाचा क्रमांक टाकून प्रवेश घेण्या च्या दिनांकची माहिती करून घ्यावी आणि त्वरीत संबंधीत शाळेत जाऊन बालकाचा प्रवेशघेण्याचे आवाहन केले आहे. 

प्रवेश न घेतलेले अंबरनाथ तर - १४५ बालकांचा समावेश आहे. याप्रमाणेच भिवंडी मनपा क्षेत्रातील १४६, भिवंडी तालुक्यातील ११, कल्याणचे -६६८, केडीएमसी क्षेत्रातील १०६, नवी मुंबईचे ३६६, शहापूरचे ३३, मीरा भाईंदरचा एक, ठाणेचे २६१ आणि उल्हासनगरच्या ३६ बालकांचा प्रवेश २९ आँक्टोंबरपर्यंत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा