रिक्षात सापडले विस्फोटक, संशयित आरोपीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 01:06 IST2018-10-03T01:05:56+5:302018-10-03T01:06:20+5:30

पश्चिमेतील शासकीय इमारतीजवळ एका रिक्षात सापडलेल्या विस्फोटक प्रकरणी संशयीत आरोपी असलेल्या चंद्रकांत शिंदे (७०) यांनी

Explosive, suspected accused suicide, found in Rickshaw | रिक्षात सापडले विस्फोटक, संशयित आरोपीची आत्महत्या

रिक्षात सापडले विस्फोटक, संशयित आरोपीची आत्महत्या

कल्याण : पश्चिमेतील शासकीय इमारतीजवळ एका रिक्षात सापडलेल्या विस्फोटक प्रकरणी संशयीत आरोपी असलेल्या चंद्रकांत शिंदे (७०) यांनी टिटवाळाजवळील घोटसई येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीत त्यांनी पाच जणांची नावे लिहिली आहेत.

चंद्रकांतच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, चंद्रकांत यांच्यावर पोलीस दबाव टाकत गुन्हा कबूल करा असे सांगत होते. पोलिसांनी चंद्रकातला गुन्हा कबूल करण्यासाठी बेदम मारहाण केल्याचा आरोप देखील कुटुंबीयांनी केला आहे. चंद्रकांत शिंदे यांच्या आत्महत्येप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title: Explosive, suspected accused suicide, found in Rickshaw