भिवंडीतील मिल्लत नगर परिसरात रस्त्यावरच फेकली कालबाह्य औषधे
By नितीन पंडित | Updated: January 24, 2023 17:41 IST2023-01-24T17:39:42+5:302023-01-24T17:41:08+5:30
रस्त्याच्या कडेला या कालबाह्य औषध व गोळ्यांचा खच पडला आहे.

भिवंडीतील मिल्लत नगर परिसरात रस्त्यावरच फेकली कालबाह्य औषधे
भिवंडी - शहरातील मिल्लत नगर परिसरात मुख्य रस्त्याच्या कडेला काल्यबाह्य औषध गोळ्या फेकून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला या कालबाह्य औषध व गोळ्यांचा खच पडला आहे. अज्ञात व्यक्तीने ही कालबाह्य औषधे रस्त्यावर फेकली असून या परिसरात लहान मुले मोठ्या प्रमाणात खेळण्यासाठी जात असतात.
या कालबाह्य गोळ्या औषधांचा वापर मुलांनी अथवा इतर कोणी केल्यास जीवावर बेतू शकते त्यामुळे या गोळ्या औषधे रस्त्यावर फेकल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. दुसरीकडे कालबाह्य औषधांची विल्हेवाट योग्य प्रकारे लावणे गरजेचे असतांनाही अशा प्रकारे औषधे रस्त्यावर फेकणाऱ्या व्यक्तीवर नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.