Expensive motorbike caught by police | ...अन् पोलिसांनी पकडली तब्बल १० लाखांची बाईक

...अन् पोलिसांनी पकडली तब्बल १० लाखांची बाईक

ठाणे : घोडबंदर परिसरात रविवारी पहाटे कासारवडवली पोलिसांनी मुंबईतून चोरी झालेली सुमारे १० लाख किमतीची स्पोर्ट्स मोटारसायकल वाहीद मंजूर खान (रा. आंबिवली, कल्याण) याच्याकडून हस्तगत केली आहे. त्याला या मोटारसायकलसह मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागलाबंदर भागात कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव हे आपल्या पथकासह २२ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गस्त घालत होते. त्याच दरम्यान त्यांना एक संशयित मोटारसायकलस्वार आढळून आला. त्याची चौकशी केली असता, वाहीद खान अशी त्याने स्वत:ची ओळख सांगितली. मात्र, त्याच्याकडील महागड्या स्पोर्ट्स मोटारबाइकच्या मालकीबाबत तसेच बाइकच्या कागदपत्रांची मात्र तो पूर्तता करू शकला नाही. त्याच्यावर संशय बळावल्याने सखोल चौकशीमध्ये त्याने ही मोटारसायकल मुंबईतील विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून चोरल्याची कबुली दिली. हा प्रकार उघड झाल्याने मोटारसायकलसह त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे खैरनार यांनी सांगितले.

Web Title: Expensive motorbike caught by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.