डोंबिवलीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या २१७ रिक्षांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 17:34 IST2018-03-06T17:32:56+5:302018-03-06T17:34:58+5:30
नियमांचे उल्लंघन करणा-या ६४ रिक्षा चालकांना कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी मंगळवारी नोटीस देत दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. शहरात दुपारी १२.३० ते दुपारी ४ या वेळेत पश्चिमेला दिनदयाळ रोडवर आरटीओ आणि वाहतूक पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शेकडो रिक्षांची तपासणी करण्यात आली.

कल्याण आरटीओ- ट्रॅफिक विभाग यांची संयुक्त कारवाई
डोंबिवली: नियमांचे उल्लंघन करणा-या ६४ रिक्षा चालकांना कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी मंगळवारी नोटीस देत दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. शहरात दुपारी १२.३० ते दुपारी ४ या वेळेत पश्चिमेला दिनदयाळ रोडवर आरटीओ आणि वाहतूक पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शेकडो रिक्षांची तपासणी करण्यात आली.
त्यात लायसन नसणे, परमीटचा आभाव, गणवेश नसणे, बॅज नसणे, रांग सोडुन-स्टँडमध्ये उभे न राहणे, कागदपत्रे नसणे, फ्रंट सिट आदींसह विविध कारणांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांना नोटीस देण्यात आल्या. त्यामुळे काह काळ पश्चिमेला रिक्षा चालकांमध्ये शिस्तीचे वातावरण होते. वाहतूक पोलिस निरिक्षक गोविंद गंभीरे यांनी यासंदर्भात माहिती देतांना सांगितले की, आरटीओ अधिका-यांनी संयुक्त कारवाई संदर्भातले आदेश दिले होते, त्यानूसार यापुढेही शहरात अशी कारवाई सुरु राहणार असून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी रिक्षा चालकांनी घ्यावी, तसेच नियमांचे उल्लंघन करुन शहराचे वाहतूक नियंत्रण कोलमडवू नये. यासंदर्भात शहरातील सर्व रिक्षा युनियन पदाधिका-यांना सूचित केले आहे. त्यांनीही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी त्यांच्या परीने योगदान द्यावे, सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन करण्यात आले.