बदलापुरात माजी जवानाचा जळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 01:25 IST2020-01-06T01:25:21+5:302020-01-06T01:25:25+5:30

नौदलातून सेवानिवृत्त झालेले मूळचे दिल्ली येथील ५0 वर्षीय गुड्डुसिंग यादव यांचा बदलापूर येथील घरात जळून मृत्यू झाला.

Ex-serviceman burnt to death in Badlapur | बदलापुरात माजी जवानाचा जळून मृत्यू

बदलापुरात माजी जवानाचा जळून मृत्यू

बदलापूर : नौदलातून सेवानिवृत्त झालेले मूळचे दिल्ली येथील ५0 वर्षीय गुड्डुसिंग यादव यांचा बदलापूर येथील घरात जळून मृत्यू झाला. ही आत्महत्या आहे की हत्या, याचा पोलीस शोध घेत आहेत. शनिवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास यादव यांच्या फ्लॅटमधून धूर निघू लागल्याने शेजारच्यांनी पोलिसांना कल्पना दिली. अग्निशमन दलही लगेचच दाखल झाले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी यादव हे १०० टक्के जळालेल्या अवस्थेत आढळले. घरातील सर्व सामानदेखील जळाले होते. धक्कादायक बाब म्हणजे एवढी मोठी घटना घडली असताना, त्यांची पत्नी मात्र घरातून निघून गेली होती. त्यामुळे घटनेमागचे गूढ वाढले आहे. ही हत्या की आत्महत्या, याचा तपास सुरु आहे.
>तीन दिवसांपासून मुक्काम
मूळचे दिल्ली येथील माजी नौदल कर्मचारी गुड्डू सिंग यादव हे बदलापूर पश्चिमेकडील खामकर विद्यालयाजवळील साई आर्केड या इमारतीत राहत होते. फ्लॅट विकण्यासाठी ते तीन दिवसांपासून बदलापुरात आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नीदेखील होती.

Web Title: Ex-serviceman burnt to death in Badlapur