शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकच होणार स्वीकृत सदस्य?

By admin | Updated: February 6, 2016 02:14 IST

समाजातील डॉक्टर, वकील, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, निवृत्त नोकरशहा यांना महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी देण्याची कायदेशीर तरतूद धाब्यावर बसवत

कल्याण : समाजातील डॉक्टर, वकील, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, निवृत्त नोकरशहा यांना महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी देण्याची कायदेशीर तरतूद धाब्यावर बसवत कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सर्वच राजकीय पक्षांनी माजी नगरसेवकांच्याच गळ्यात स्वीकृतची माळ घालण्याचा निर्धार केला आहे. १० फेब्रुवारीला विशेष महासभेत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे.शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी ५ जागांसाठी ८ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना, भाजपा आणि मनसेने स्वीकृतसाठी माजी नगरसेवकांना संधी दिली. ज्या राष्ट्रवादीचे स्वीकृत सदस्य निवडून देण्याएवढे संख्याबळ नाही, त्या पक्षाने वकिलास उमेदवारी देण्याचा मानभावीपणा केला आहे.महाराष्ट्र महानगरपालिका नियम २०१२ नुसार या पदासाठी प्रशासकीय अनुभव बंधनकारक केला आहे. त्याचबरोबर शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर, इंजिनीअर आणि नोंदणीकृत अशासकीय संघटनेचा पदाधिकारी यांना ही पदे द्यावी, असे स्पष्ट केले आहे. या तरतुदीचा राजकीय पक्ष अवलंब करतात किंवा कसे, याकडे लक्ष लागले होते. सभागृहातील संख्याबळ पाहता शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी २ तर मनसेचा १ सदस्य असे ५ सदस्य निवडले जाणार आहेत. परंतु, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही अर्ज दाखल केले आहेत.शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने प्रभुनाथ भोईर, विश्वनाथ राणे, संजय पावशे, जनार्दन म्हात्रे यांनी तर भाजपाकडून राजन सामंत आणि अभिमन्यू गायकवाड यांनी अर्ज भरले. मनसेकडून पवन भोसले यांनी उमेदवारी दाखल केली. हे सर्व माजी नगरसेवक असल्याने समाजातील अन्य घटकांना संधी मिळणार नाही. पुरेसे संख्याबळ नसतानाही राष्ट्रवादीने अ‍ॅड. गणेश घोलप यांचा अर्ज दाखल करून आपण वकिलास संधी देत असल्याचा मानभावीपणा केला आहे.