प्रत्येक पोलीस अधिकारी - कर्मचारी हे चालते बोलते पुस्तक - विवेक फणसळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 02:24 PM2020-01-06T14:24:31+5:302020-01-06T14:28:08+5:30

पोलीसांनीही पुस्तकातून आपले अनुभव लिहावे असे वक्तव्य पोलीस आयुक्तांनी केले.

 Every police officer - employee talks about this book - Vivek Phansalkar | प्रत्येक पोलीस अधिकारी - कर्मचारी हे चालते बोलते पुस्तक - विवेक फणसळकर

प्रत्येक पोलीस अधिकारी - कर्मचारी हे चालते बोलते पुस्तक - विवेक फणसळकर

Next
ठळक मुद्दे प्रत्येक पोलीस अधिकारी - कर्मचारी हे चालते बोलते पुस्तक - विवेक फणसळकरलेखक व्यंकट पाटील यांच्या कादंबरीचे प्रकाशन तिरंगा आणि गणवेशाविषयी मला नितांत आदर - गंगाराम गवाणकर

ठाणे: प्रत्येक पोलीस अधिकारी - कर्मचारी हे चालते बोलते पुस्तक आहे. पण ते लिखाण करीत नाहीत. त्यांनी पोलीस खात्यातील आपले अनुभव पुस्तक स्वरुपात लिहावे. जेणेकरुन त्यांचे अनुभव हे पोलीस खात्यातील पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरतील असे प्रतिपादन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले.
     शारदा प्रकाशनच्यावतीने नुकतेच निवृत्त झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त, लेखक व्यंकट पाटील यांच्या कादंबरीचे प्रकाशन सिद्धी हॉल येथे करण्यात आले. यावेळी फणसळकर आपल्या मनोगतात म्हणाले की, पोलीस खात्यात भरती, पदोन्नती, निवृत्ती हे तीन टप्पे आहेत. भरती, पदोन्नतीवेळी आनंद होत असला तरी सन्मानाने सेवा निवृत्त व्हावे हा देखील आनंदाचा अनुभव असतो. पोलीसांबद्दल अजिबात भिती बाळगू नये, पोलीस हे सृजनशील, सभ्य आणि सुसंस्कृत असतात असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर म्हणाले की, तिरंगा आणि गणवेशाविषयी मला नितांत आदर आहे. एका गणवेशात किती सजग आणि हळवा व्यक्ती लपलेला आहे हे वारसा कादंबरी वाचल्यावर कळते. वाचनसंस्कृती बंद झालेली असताना, मोबाईलवर वाचन सुरू असताना पाटील यांच्या चार आवृत्त्या निघणे हे कौतुकास्पद आहे. पाटील हे कधीही निवृत्त होणार नाहीत कारण त्यांच्यात एक कलावंत दडलेला आहे. पुस्तकांबरोबर माणूस वाचू शकतो तो जास्त लिहू शकतो. पोलीसांइतके माणसे कोणी वाचत नाहीत असे सांगत पाटील यांनी लिहीत जावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या. मुंबई वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त मधुकर पांड्ये म्हणाले की, पोलीसांनी एखादे पुस्तक लिहीणे हा सुखद धक्काच आहे. नोकरी करीत असताना शेवटपर्यंत आपले छंद जोपासणे हे कौतुकास्पद असून याचा मला आनंद आहे. निवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक माधव माळवे यांनी पाटील यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. निवृत्त पोलीस अधिकारी - कर्मचारी यांची परिषद घेण्याची विनंती फणसळकर यांना केली. लेखक पाटील म्हणाले की, भरती, पदोन्नतीवेळी उत्साह असतो पण निवृत्तीकडे जाताना यातना होतात. पोलीस हा माणूसच असतो. त्यांच्या सामान्यजीवनाकडे सगळ््यांनी पाहीले पाहिजे. पोलीस खात्यात यशस्वी होण्याचे एकच कारण म्हणजे अथक आणि कठोर परिश्रम आणि सत्याच्या वाटेवर चालणे. यावेळी लेखिका, कवयित्री प्रज्ञा पंडीत, प्रकाशक अरु ण हरकारे हरकारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार, प्रकाशक प्रा. संतोष राणे आणि पाटील यांच्या पत्नी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे निवेदन नीता माळी यांनी केले.
 

Web Title:  Every police officer - employee talks about this book - Vivek Phansalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.