शहरं
Join us  
Trending Stories
1
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
2
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
3
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
4
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
5
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
6
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
7
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
8
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
9
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
10
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
11
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
12
मलायका-अर्जुनचं खरंच ब्रेकअप झालं का? मॅनेजर म्हणते- "ते अजूनही..."
13
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
14
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले
15
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
16
'लगान' नाही तर 'या' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती किरण राव आणि आमिर खानची लव्हस्टोरी
17
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
18
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  
19
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
20
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल

शिमगा गेला, गुढी उतरली तरी महायुतीचा उमेदवार ठरेना

By अजित मांडके | Published: April 12, 2024 8:24 AM

उमेदवार शिंदेसेना की भाजपच्या चिन्हावर लढणार याचा वाद

अजित मांडके 

ठाणे :  शिमगा गेला, गुढीदेखील उभारली गेली, तरीसुद्धा अद्याप ठाणे लोकसभेचा महायुतीचा उमेदवार घोषित झालेला नाही. उमेदवार निश्चित नसताना प्रचार मात्र सुरू आहे. उमेदवार निश्चित होत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. लवकर उमेदवार जाहीर करा, अशी मागणी कार्यकर्ते करीत आहेत. ठाणे शिंदेसेनेचा गड. तरी भाजपने यावर दावा ठोकला आहे. 

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपला मोठा इतिहास आहे. मागील काही वर्षे या मतदारसंघावर शिवसेनेने राज्य केले. तत्पूर्वी या मतदारसंघावर भाजपचा वरचष्मा होता. परंतु, सध्याची राजकीय परिस्थिती बदलल्याने भाजपने या मतदारसंघावर आपला दावा अधिक प्रबळ केला आहे. परंतु, शिंदेसेना हा मतदारसंघ सोडण्याच्या मन:स्थितीत नाही. महायुतीकडून मोदीच आपले उमेदवार असल्याचे सांगत मेळावे घेतले जात आहेत. परंतु, जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाही, तोपर्यंत प्रचाराला सुरुवात झालेली  नाही. विद्यमान खासदारांकडून हे संकेत पाळले गेले आहेत. असे असतानाही प्रचाराचा नारळ महायुतीकडून वाढविण्यात आला. 

महायुतीचे मेळावे घेतले जात असून, या मेळाव्यात शिंदेसेना आणि भाजपकडून इच्छुक असलेले सर्वच उमेदवार एकाच व्यासपीठावर हजर राहत आहेत. परंतु, आपण प्रचार नेमका कोणाचा करायचा, आपल्या विभागात कोणासाठी मते मागायची याबाबत कार्यकर्ता संभ्रमावस्थेत आहे. धुळवडीच्या दिवशी उमेदवार जाहीर होईल, असे सुरुवातीला सांगितले होते. उमेदवाराची घोषणा गुढीपाडव्याच्या दिवशी केली जाईल, असे सांगितले होते. परंतु, होळी आणि गुढी सरली, तरीसुद्धा महायुतीचा उमेदवार काही जाहीर होत नाही.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, उद्धवसेनेकडून जो उमेदवार रिंगणात आहे, त्याला महायुतीकडून कमी लेखले जात नाही. महायुतीकडून सावध पावले टाकली जात आहेत. आताच उमेदवार जाहीर केला किंवा ही जागा भाजपला सोडली तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याचा अभ्यास शिंदेसेना आणि भाजप करीत आहे. शिंदेसेनेकडून आताच उमेदवार जाहीर केला गेला तर विरोधकांकडून निष्ठावंत विरुद्ध गद्दार असा प्रचार केला जाऊ शकतो. ते शिंदेसेनेला न परडवणारे आहे. त्यामुळे ऐनवेळी उमेदवार जाहीर करण्याचा विचार महायुती करीत आहे.  

टॅग्स :MahayutiमहायुतीthaneठाणेElectionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४