बहुमतानंतरही काँग्रेसने शिवसेनेचा हात धरला, घसरगुंडी काही केल्या थांबेना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 07:44 IST2025-12-21T07:44:01+5:302025-12-21T07:44:29+5:30
२०१७ मध्ये झाला होता प्रयोग; समाजवादी पार्टी-भाजप यांच्यात लढतीची शक्यता

बहुमतानंतरही काँग्रेसने शिवसेनेचा हात धरला, घसरगुंडी काही केल्या थांबेना!
- नितीन पंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग २०१९ मध्ये झाला. पण, त्यापूर्वी दोन वर्षे भिवंडी महापालिकेत काँग्रेसने बहुमत मिळूनही शिवसेनेला सत्तेत सोबत घेतले आणि तेव्हापासून भिवंडीतील काँग्रेसची सुरू झालेली घसरगुंडी थांबलेली नाही. मुस्लीमबहुल भिवंडीत गेल्या काही वर्षांत समाजवादी पार्टीने जोर धरला आहे. सध्या येथे समाजवादी पार्टी विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे विजयी झाल्याने त्या पक्षाला येथे किती यश मिळते, याचेही औत्सुक्य आहे.
शरद पवार गटाने येथे मुळे मजबूत केली की समाजवादी पक्षाने मुस्लीम मतदार खेचून ताकद वाढवली हे निकालानंतर स्पष्ट होईल. तर एकत्रित शिवसेनेतील सर्व १२ नगरसेवक शिंदेसेनेत गेल्याने निवडणुकीत उद्धवसेनेसमोर आव्हान आहे. अद्याप मनसेने भिवंडीत आपले स्थान बळकट केलेले नाही. शिंदेसेना व भाजपने मराठी, गुजरातीबहुल प्रभागांवर लक्ष केंद्रित केले आहे.
कोणते मुद्दे निर्णायक ?
मेट्रो प्रकल्पासाठी महापालिकेने अंजुरफाटा ते कल्याण नाका रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू केले असून, यात दोन्ही बाजूंच्या घर व दुकानांवर कारवाई केली. त्यामुळे बाधितांमध्ये लोकप्रतिनिधींबाबत आक्रोश आहे.
खड्डेमय व अरुंद रस्ते तसेच रस्त्यांवरील अतिक्रमणांकडे मनपाचे झालेले दुर्लक्ष यामुळे शहरात वाढलेली वाहतूककोंडी व अपघाती मृत्यूंचे वाढते प्रमाण
तसेच शहरातील कचरा आणि 3 डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न गंभीर आहे. तसेच अनेक भागांत अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांत नाराजी आहे.
महापालिकेत कुणाची होती सत्ता?
काँग्रेस
४७
भाजप
१९
शिवसेना
१२
कोणार्क विकास आघाडी
आरपीआय एकतावादी
४
४
समाजवादी
अपक्ष
२
मागील निवडणुकीत एकूण मतदार किती ?
एकूण
४,७९,२५३
पुरुष
२,९१,९९१
महिला
१,८७,२६०
इतर ।
२
आता एकूण किती मतदार ?
एकूण
६,६९,०३३
पुरुष
३,८०,६२३
महिला
२,८८,०९७
इतर ।
३१३