स्वातंत्र दिनानिमित्त उल्हासनगरात बालसुरक्षा समितीची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 19:46 IST2021-08-15T19:46:16+5:302021-08-15T19:46:27+5:30
लहान मुलांच्या अनेक समस्या असून त्याकडे गंभिर्याने लक्ष दिलं जात नाही. अनेक मुलांना पालक नसल्याने बाल कामगार, बाल विवाह, लैगिंक अत्याचार, सिंगल पालकत्व व आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला.

स्वातंत्र दिनानिमित्त उल्हासनगरात बालसुरक्षा समितीची स्थापना
उल्हासनगर- स्वातंत्र्य दिनानिमित्त सम्राट अशोकनगरमध्ये नगरसेविका सविता तोरणे रगडे यांच्या अध्यक्षतेखाली बाल सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली. समितीमुळे लहान मुलांच्या विविध समस्यांकडे लक्ष जाणार असून विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती समाजसेवक शिवाजी रगडे यांनी दिली.
लहान मुलांच्या अनेक समस्या असून त्याकडे गंभिर्याने लक्ष दिलं जात नाही. अनेक मुलांना पालक नसल्याने बाल कामगार, बाल विवाह, लैगिंक अत्याचार, सिंगल पालकत्व व आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. यासाठी राज्य सरकारने सन २०१४ साली आदेश काढून वॉर्ड पातळीवर बाल सुरक्षा समिती स्थापन करण्यात येत आहे. अशा मुलांना निवारा व सुरक्षा उपलब्ध होण्यासाठी समाजसेवक शिवाजी रगडे प्रयत्न करणार आहेत. यापूर्वी त्यांनी बाल कल्याण समितीच्या सहकार्याने टायगर प्रकरण यशस्वीरीत्या हाताळले. बाल कल्याण समितीच्या सहकार्याने स्वातंत्र्यदिनी सम्राट अशोकनगरमध्ये वॉर्ड बाल सुरक्षा समिती स्थापन केली.
कार्यक्रमाला बाल सुरक्षा समितीच्या अध्यक्ष नगरसेविका सविता तोरणे रगडे, रिपाइं नेते व राजर्षी शाहू विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महादेव सोणवने, मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी दीपाली वाघ, डॉ भूमिका गिरी, मुख्यध्यापक मीनाक्षी सोनवणे, समाजसेवक शिवाजी रगडे, रामेश्वर गवई, दशरथ चौधरी, सुनील खांडेकर, दीपाली समाधान वाघ, माया रौराळे, जयश्री रगडे, भास्कर जाधव, प्रतीक रौराळे, अंकिता जामणिक आदी उपस्थित होते.