इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये भाईंदरच्या वंजारी यांची नोंद
By धीरज परब | Updated: September 26, 2022 17:50 IST2022-09-26T17:49:10+5:302022-09-26T17:50:10+5:30
सेवन डिग्री ब्लॅक बेल्ट असलेले आंतरराष्ट्रीय कराटेपटू व पंच सुधीर श्रीकृष्ण वंजारी यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये निवड झाली आहे.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये भाईंदरच्या वंजारी यांची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड: सेवन डिग्री ब्लॅक बेल्ट असलेले आंतरराष्ट्रीय कराटेपटू व पंच सुधीर श्रीकृष्ण वंजारी यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये निवड झाली आहे.
भाईंदर पूर्वेच्या गोडदेव भागात राहणारे कराटेपटू सुधीर वंजारी यांनी आता पर्यंत विविध स्पर्धां मध्ये पारितोषिके मिळवली आहेत . सप्टेंबर १९८७ मधे जपान मधे झालेल्या कराटे स्पर्धेत ओपन फाईट मध्ये ब्रांझ पदक जिंकले होते. त्यावेळी जपान मध्ये कराटे स्पर्धेत ब्रांझ पदक पटकावणारे ते पहिले भारतीय ठरले होते. विशेष म्हणजे १० ऑगस्ट ला जपान चे तिकीट होते व ३ ऑगस्ट ला त्यांच्या आईचे निधन झाले असताना देखील त्यांनी हे यश संपादन केले होते. वंजारी यांचे शहरातून अभिनंदन केले जात आहे .