शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

महिलांंसाठी लवकरच वाढीव डबे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 11:21 PM

मध्य रेल्वेच्या सर्वच स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या महिला रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत लोकलमधील महिलांचे डबे अपुरे पडत आहेत.

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या सर्वच स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या महिला रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत लोकलमधील महिलांचे डबे अपुरे पडत आहेत. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी मध्य रेल्वेचे विभागीय सहव्यवस्थापक विद्याधर मालेगावकर यांची भेट घेऊन त्यांचे याकडे लक्ष वेधले. त्यावर लवकरच महिला प्रवाशांसाठी लोकलचे पहिले तीन डबे राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.डोंबिवलीतून महिला विशेष लोकल सोडण्याची मागणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळातील तपासे, प्रसन्न आचलकर यांनी डोंबिवली स्थानक प्रबंधकांकडे केली होती. त्यावर त्यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा करावी, असा सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी मालेगावकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर आदी स्थानकांमधील समस्यांचे निवेदन दिले.चर्चेदरम्यान मालेगावकर म्हणाले, ‘सध्या मध्य रेल्वेवर दररोज लोकलच्या एक हजार ७७४ फेºया होतात. सरासरी ३-४ मिनिटांना एक लोकल धावते. पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याशिवाय जादा लोकल सोडणे शक्य नाही. पण २०१९ पर्यंत ही सर्व कामे पूर्ण होऊन तांत्रिक चाचण्या व तपासण्या केल्या जातील. त्यामुळे आणखी काही महिने मात्र गैरसोय होण्याची शक्यता आहे.’‘दरवर्षी लाखोंच्या संख्येने प्रवासी वाढत आहेत. अनेक कार्यालयांतील नोकरीच्या वेळा सारख्या आहेत. त्यामुळे गर्दीत वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या स्तरावर ठोस निर्णय होणे आवश्यक आहे. गर्दीची विभागणी झाल्यास काहीसा दिलासा मिळू शकेल. महिलांसाठी लोकलमधील पहिले तीन डबे राखीव ठेवण्यासंदर्भात वेगाने हालचाली सुरू आहेत. हा निर्णय झाल्यास महिला प्रवाशांना दिलासा मिळेल,’ असे मालेगावकर पुढे म्हणाल्याचे तपासे यांनी सांगितले.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेWomenमहिला