शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांमुळे पालिका होतेय रिकामी, २०१९ मध्ये अर्धी महापालिका होणार रिकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 5:52 PM

मागील काही वर्षापासून ठाणे महापालिकेत सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. येत्या २०१९ मध्ये तर अर्धी महापालिका रिकामी होणार आहे. ज्या पध्दतीने कर्मचारी सेवा निवृत्त होत आहे, त्यापध्दतीने भरती मात्र होतांना दिसत नाही.

ठळक मुद्देसेवा निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिकमे महिन्यात झाले एकाच दिवशी ८५ कर्मचारी सेवा निवृत्त

ठाणे - ठाणे महापालिकेत मागील तीन वर्षापासून सेवा निवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मागील महिन्यात तर एकाच दिवशी म्हणजेच ३१ मे रोजी तब्बल ८५ कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत. ही गळती २०१९ मध्ये अधिक वाढणार आहे. त्यामुळे कर्मचारी, वरीष्ठ अधिकाऱ्यांची ही पोकळी निर्माण होणार आहे.              ठाणे महापालिकेच्या सेवेतून मागील महिन्यात एकाच दिवशी ८५ कर्मचारी सेवा निवृत्त झाले. या निवृत्तांच्या यादीत कळवा हॉस्पिटलमधील ६ जणांचा समावेश आहे. पावसाच्या तोंडावर कमी पडणारे मनुष्यबळ त्रासदायक ठरणार आहे. वास्तविक पहाता एवढ्या मोठ्या संख्येत कर्मचारी अधिकारी निवृत्त क्षमतेवरून दिसून येत आहे. वास्तविक पहाता या जागा निवृत्त होण्यापूर्वीच ६ महिने आधीच नव्या जागा भरणेेबंधनकारक आहे. ठामपात या गोष्टी मात्र नेहमीच उडवाउडवीच्या असतात. त्याचा फटका आता पालिकेला येत्या वर्षभरात आणखी तीव्र स्वरुपात बसण्याची चिन्हे आहेत. येत्या २०१९ मध्ये अर्धी महापालिका सेवा निवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमुळे रिती होणार आहे. आताच एका एका वरीष्ठ अधिकाऱ्याला तीन ते चार विभागांचा चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आहे त्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढतांना दिसत आहे. ठाणे महापालिकेत २०१५ मध्ये १३८ वर्ग १ ते ४ मधील अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाले होते. तर १० जणांनी स्वेच्छा निवृत्ती स्विकारली होती. २०१६ मध्ये निवृत्तीचा आकडा हा १५० वर गेला. तर स्वेच्छा निवृत्तींची संख्या २५ होती. तर २०१७ मध्ये १९३ आणि स्वेच्छा निवृत्तीचा आकडा हा ३० एवढा होता. त्यानुसार २०१५ मे २०१८ अखेर पर्यंत तब्बल ६६६ कर्मचारी, अधिकारी हे सेवा निवृत्त झाले आहेत.ठाणे महापालिकेने सरळ सेवेने भरलेली पदेएकीकडे ठाणे महापालिकेत मागील काही वर्षात सेवानिवृत्तीचे प्रमाण वाढत असतांना दुसरीकडे या कालावधीत ६३९ पदे ही सरळ सेवेने भरली आहेत. यामध्ये २०१५ मध्ये १३१, २०१६-१७ मध्ये २७४ आणि २०१७-१८ या कालावधीत २३४ पदे भरलेली आहेत. यामध्ये वर्ग ४ पदांचे कर्मचाऱ्यांचे प्रमाण हे २६९ हे होते. परंतु भरलेल्या पदांची संख्या ही १६१ एवढी आहे.६२९ कर्मचाऱ्यांना दिली पद्दोन्नतीठाणे महापालिकेने २०१५ ते २०१७ या कालावधीत ६२९ कर्मचारी, अधिकाऱ्यांना पद्दोन्नती दिली आहे. यामध्ये २०१५ मध्ये २८३, २०१६ मध्ये १२५ आणि २०१७ मध्ये २२१ कर्मचाऱ्यांना पद्दोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये २०१६ मध्ये वर्ग एक च्या ०६ आणि २०१७ मध्ये ०४ कर्मचाऱ्यांना पद्दोन्नती देण्यात आली. तर वर्ग दोन मध्ये ५६, वर्ग तीनच्या ४३६ आणि वर्ग चारच्या १२७ जणांना पद्दोन्नती देण्यात आली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त