शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

Electricty Update: डोंबिवलीकरांच्या घरांत ‘दिवाळी’; लाईट न गेल्यानं आश्चर्याचा धक्का बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 12:37 AM

नेतिवलीत ‘टाटा’चे दोन फिडर पडले बंद : २४ लाख ४० हजार ग्राहकांना दिलासा

डोंबिवली : विजेच्या लपंडावाकरिता नेहमीच ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली शहरातील बहुतांश वीजग्राहकांना सोमवारी मुंबई, ठाण्यातील बत्ती गुल झाल्याचा फटका बसला नाही. मात्र, आश्चर्याचा धक्का बसला.

संपूर्ण मुंबई, ठाणे परिसराला वीजपुरवठा करणाºया मुख्य वाहिनीत सोमवारी सकाळी १० वाजून ७ मिनिटांनी बिघाड झाला असतानाही डोंबिवली, कल्याण परिसरातील २४ लाख ६० हजार ग्राहकांना मात्र त्याचा फटका बसला नाही. महावितरणच्या कल्याण परिमंडळात एकूण २५ लाख ग्राहक आहेत. त्यापैकी कल्याण पूर्वेतील काही ग्राहक टाटा कंपनीच्या नेतिवली येथील सबस्टेशनमधून पुरवठा करण्यात येणाºया विजेवर अवलंबून आहेत. अशा ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी खंडित झाला होता.

महावितरणच्या कल्याण परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विजयसिंह दूधभाते म्हणाले की, टाटा कंपनीकडून कल्याण परिमंडळात दोन फिडरवर सप्लाय होतो. ते केबी-१, केबी-२ कल्याण पूर्वेला येतात. त्यामुळे तेथील सुमारे ६० हजार ग्राहकांची वीज खंडित झाली, पण या परिमंडळातील अन्य ग्राहकांकडे वीज सुरळीत सुरू होती. केबी-२ फिडरवरून कल्याण पश्चिमेला वीजपुरवठा होतो. कल्याण पश्चिमेतील वायलेनगर, पारनाका, दुर्गाडी, गांधारी रोड, आधारवाडी परिसरातील सुमारे ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. तर, केबी-१ फिडरवरून वीजपुरवठा होणाºया कल्याण पूर्वेतील ९० फूट रोड, टाटा नेतिवली परिसरातील सुमारे १० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. या फिडरवरील वीजग्राहकांना पर्यायी फिडरमार्फत वीजपुरवठा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू होते. संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला होता. अन्य १५ हजार जणांचा वीजपुरवठा रात्री उशिरा पूर्ववत झाला.

कल्याण, डोंबिवलीसह या परिमंडळात महावितरणच्या पडघा येथील मुख्य वीजकेंद्रातून वीज पुरवली जाते, ती डोंबिवलीत पाल येथील सबस्टेशनमधून एमआयडीसी व अन्य उपकेंद्रातून डोंबिवली शहरात अन्यत्र पुरवली जाते. टाटाची वीज गेल्याने त्याचा फटका रेल्वे सेवेलादेखील बसला. सकाळी १० वाजल्यानंतर कामावर जाणारे चाकरमानी रेल्वेस्थानकातून घरी गेले. काही जण ठिकठिकाणी लोकलमध्ये अडकले.बससाठी ताटकळले, रिक्षाचालकांनी लुबाडलेडोंबिवली : वीजपुरवठा खंडित झाल्याचा फटका रेल्वेला बसल्याने सोमवारी सकाळी १० वाजल्यानंतर जे नोकरदार कामावर जाणार होते, ते कल्याण, डोंबिवली रेल्वेस्थानकांत काही वेळ लोकलची वाट बघून पुन्हा माघारी फिरले. पण, ज्यांना कामावर जाणे गरजेचे होते, त्यांना बसमार्गे ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथे जाण्यासाठी बसस्टॅण्डवर रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. अनेकांनी बराच वेळ झाला तरी बसची रांग कमी होत नाही, असे बघून दुपारी एक-दीड वाजल्यानंतर घरी जाणे पसंत केले. अचानक लोकल सेवा बंद झाल्याने बसगाड्यांची संख्या वाढवणे अशक्य होते. त्यामुळे बस आल्यावर त्यात घुसण्याकरिता झुंबड उडाली होती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले गेले. तसेच जे प्रवासी बस, अन्य खासगी वाहनाने ठाण्याच्या दिशेने गेले, त्यांना शीळ रस्त्यावर अडकावे लागले, तेथे प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. या संपूर्ण गोंधळाचा गैरफायदा रिक्षाचालकांनी घेतला. रिक्षाचे भाडे दुप्पट-तिप्पट करून त्यांनी नाडलेल्या नोकरदारांना अक्षरश: लुबाडले. लॉकडाऊनमधील नुकसानीची भरपाई केली.

टॅग्स :electricityवीजdombivaliडोंबिवली