मुंब्य्रात ग्राहकाला साडेआठ लाखांचे वीजबिल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 00:47 IST2020-02-23T00:47:12+5:302020-02-23T00:47:24+5:30

महावितरणचा झटका; ४८ हजार युनिटची नोंद

Electricity bill of Rs 8.5 lakh for customer in Mumbra! | मुंब्य्रात ग्राहकाला साडेआठ लाखांचे वीजबिल!

मुंब्य्रात ग्राहकाला साडेआठ लाखांचे वीजबिल!

- कुमार बडदे 

मुंब्रा : घरात दोन ट्युब, फ्रीज, टीव्ही आणि पंखा ही उपकरणे असलेल्या मुंब्य्रातील विजया चव्हाण या ग्राहकाला महावितरणने फेब्रुवारीमध्ये आठ लाख ५५ हजार ५५० रुपयांचे वीजबिल पाठवून जोराचा झटका दिला आहे. या महिन्यामध्ये ४८ हजार ७९७ युनिट वापरण्याची नोंद असलेले वीजबिल पाहून या ग्राहकाचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे.

मुंब्रा बाजारपेठेतील अरिहंत अपार्टमेंट या इमारतीत चव्हाण या तिसऱ्या मजल्यावर राहतात. अनेक वर्षांपासून त्या महिन्याच्या महिन्याला वीजबिल भरत आहेत. नोव्हेंबर २०१९ ते जानेवारी २०२० दरम्यानच्या तीन महिन्यांत त्यांना सरासरी ७९ युनिट वापरल्याचे देयक येत होते. मात्र, फेब्रुवारीमध्ये ४८ हजार ७९७ युनिट वापर करून भरमसाट वीजबिल पाठवले आहे. साडेआठ लाखांचे देयक पाहून चव्हाण या सैरभैर झाल्या असून मानसिक तणावात आहेत. याबाबत नेमकी दाद कोणाकडे मागायची, तक्र ार कुणाकडे करायची, याबाबत असा प्रश्न त्यांना पडल्याने त्यांची कैफियत ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने महावितरणचे कार्यकारी अभियंता (शीळ विभाग) पांडुरंग हुंडेकरी यांच्याकडे मांडली. त्यांनी संबंधित वीजग्राहकाला मेक औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या महावितरणच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांशी सोमवारी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.

Web Title: Electricity bill of Rs 8.5 lakh for customer in Mumbra!