शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमध्ये पोलिसांचे निवडणूक ऑलाउट ऑपरेशन 

By धीरज परब | Updated: March 24, 2024 11:33 IST

मीरा भाईंदर मध्ये पोलिसांनी ऑलआऊट ऑपरेशन राबवत कारवाया केल्या . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने १६ मार्च पासुन आचार संहिता लागु झाली असून मीरा भाईंदर मध्ये पोलिसांनी ऑलआऊट ऑपरेशन राबवत कारवाया केल्या . 

पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त  श्रीकांत पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड सह परिमंडळ १ मधील सर्व सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , पोलीस अधिकारी - कर्मचारी यांनी  ऑल आउट कोबिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबवण्यात आली होती. 

ऑल आउट कोबिंग ऑपरेशन दरम्यान ५ वॉरंट मधील व फरारी २ आरोपी यांना अटक करण्यात आली . अमली पदार्थ विरोधी कायद्या खाली ११ गुन्हे दाखल करण्यात आले तर १७ जणांवर सी.आर.पी.सी. १०७ प्रमाणे प्रतिबंधत्मक कारवाई करण्यात आली.  दारुबंदी कायद्यान्वये ६ गुन्हे दाखल करण्यात आले, कोप्ता अंतर्गत १५ अदखलपात्र गुन्हे दाखल केले . गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या १७ हिस्ट्रीशिटर यांची तपासणी केली . शहरात राहणारे ८ विदेशी नागरीक तपासले तर ७ तडीपार इसमाची माहिती घेण्यात आली . शहरातील ५४ ऑर्केस्ट्रा बार व लॉजेस तपासण्यात आले होते . 

पोलिसांनी १९ विविध ठिकाणी अचानकपणे नाकाबंदीचे लावली. नाकाबंदीच्या वेळी ३९७ संशयीत वाहने तपासण्यात आली असुन मोटार वाहन कायदया अन्वये १४९ केसेस करण्यात आल्या आहेत अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४