वृद्धेला लुबाडले, सोन्याच्या बांगड्याची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 19:14 IST2023-09-18T19:14:03+5:302023-09-18T19:14:13+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-१, शिवनगर येथील दुकाना समोर रविवारी दुपारी २ वाजता ७० वर्षीय शांती रमेशलाल मनवानी उभ्या होत्या.

Elderly man robbed, gold bangle stolen | वृद्धेला लुबाडले, सोन्याच्या बांगड्याची चोरी

वृद्धेला लुबाडले, सोन्याच्या बांगड्याची चोरी

सदानंद नाईक

 उल्हासनगर : कॅम्प नं-१, शिवनगर येथील दुकाना समोर रविवारी दुपारी उभ्या असलेल्या शांती मानवानी यांना २ तरुणांनी मोफत राशन मिळत असल्याची बतावणी केली. राशन मिळण्यासाठी हातातील सोन्याच्या बांगड्या व चप्पल पिशवीत ठेवण्यास सांगून हातचलाखीने सोन्याच्या बांगड्या घेऊन पोबारा केला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

उल्हासनगर कॅम्प नं-१, शिवनगर येथील दुकाना समोर रविवारी दुपारी २ वाजता ७० वर्षीय शांती रमेशलाल मनवानी उभ्या होत्या. त्यावेळी दोन तरुण तेथे येऊन त्यांनी शांती मानवानी याना शेजारील गुरुद्वार जवळ मोफत राशन मिळत असल्याचे सांगितले. राशन मिळण्यासाठी हातातील सोन्याच्या बांगड्या व चप्पल एका पिशवीत ठेवण्यास सांगितले. त्यावेळी दोघा तरुणांनी हात चलाखीकरून ५० हजार किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून पोबारा केला. सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन अज्ञात तरुणावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Elderly man robbed, gold bangle stolen