अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा वृद्ध अटकेट
By कुमार बडदे | Updated: February 7, 2023 20:49 IST2023-02-07T20:49:28+5:302023-02-07T20:49:57+5:30
या प्रकाराने भयभीत झालेल्या पीडित मुलींनी याबाबतची माहिती त्यांच्या आईला दिली.

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा वृद्ध अटकेट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्राः शेजारी राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना खाऊ देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून त्यांचे लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६० वर्षाच्या वृद्धाला मुंब्रा पोलिसांनी अटक केली. दिवा शहरात रहात असलेला सदर वृद्ध त्याच्या घराशेजारी रहात असलेल्या नऊ आणि सात वर्र्षाच्या मुलींना खाऊ देण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी नेऊन त्याच्यावर अत्याचार करत होता.
या प्रकाराने भयभीत झालेल्या पीडित मुलींनी याबाबतची माहिती त्यांच्या आईला दिली. त्यामुळे त्याचे बिंग फुटले. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच त्याला तत्काळ अटक करण्यात आली असून,न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांनी लोकमतला दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"