ठाण्याचे पालकमंत्रिपद एकनाथ शिंदेंकडेच? महापालिका निवडणुकीवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 09:00 IST2024-12-12T09:00:05+5:302024-12-12T09:00:11+5:30

विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातून महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यातही ठाणे जिल्ह्यात भाजपचे नऊ, तर शिंदेसेनेचे सहा आमदार आहेत.

Eknath Shinde's guardianship of Thane? Focus on municipal elections | ठाण्याचे पालकमंत्रिपद एकनाथ शिंदेंकडेच? महापालिका निवडणुकीवर लक्ष

ठाण्याचे पालकमंत्रिपद एकनाथ शिंदेंकडेच? महापालिका निवडणुकीवर लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत. विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भाजपचे जास्त आमदार विजयी झाल्याने ठाण्याचे पालकमंत्रिपद भाजपच्या मंत्र्याकडे द्यावे, असा भाजपचा आग्रह आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाणे जिल्ह्यावर आपला वरचष्मा ठेवण्यासाठी शिंदेसेनेला आपल्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ठेवायचे आहे. 

विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातून महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यातही ठाणे जिल्ह्यात भाजपचे नऊ, तर शिंदेसेनेचे सहा आमदार आहेत. मागील सरकारमध्ये शिंदेसेनेचे शंभुराज देसाई हे पालकमंत्री होते. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकत्व मिळावे, यासाठी भाजपकडून दावा केला गेला आहे. मागील विधानसभा निवडणुकीतही भाजप शिवसेनेपेक्षा वरचढ ठरली असतानाही शिंदेसेनेने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद पदरात पाडून घेतले होते. यावेळी निवडणुकीत भाजपने जिल्ह्यात १०० टक्के स्ट्राइक रेट ठेवला, तर शिंदेसेनेचा ९० टक्के राहिला आहे; परंतु काही झाले तरी शिंदेसेना ठाणे जिल्ह्याचे पालकत्व सोडण्याच्या तयारीत नाही. 

शक्यतेला दुजोरा
nवाद शमविण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
nशिंदेसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने या शक्यतेला दुजोरा दिला. एकनाथ शिंदे हेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होतील, असा दावा त्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर केला.

Web Title: Eknath Shinde's guardianship of Thane? Focus on municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.