शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Eknath Shinde: ‘ऑपरेशन लोटस’मध्ये शिंदेंना चव्हाणांची साथ, सोमवारी मध्यरात्रीपासून दोघेही नॉट रिचेबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 06:42 IST

Eknath Shinde: युतीच्या काळात दोन विधानसभा, तीन लोकसभा आणि तेवढ्याच महापालिका निवडणुका एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण हे दोघे सोमवारी  (दि. २०) रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : युतीच्या काळात दोन विधानसभा, तीन लोकसभा आणि तेवढ्याच महापालिका निवडणुका एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण हे दोघे सोमवारी  (दि. २०) रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत. सुरतमध्ये आकाराला येत असलेल्या शिंदे यांच्या ‘ऑपरेशन लोटस’मध्ये चव्हाण यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.माजी खासदार आनंद परांजपे, विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवडणुकीत आमदार चव्हाण यांच्यावर सर्व प्रचारसभा, गर्दीचे नियोजन विश्वासाने सोपवून शिंदे जिल्ह्यातील अन्य उमेदवारांच्या प्रचारात  व्यस्त असायचे. युतीत असताना आणि आता युती नसताना शिंदेंवर टीकास्त्र सोडण्याचे चव्हाण यांनी एक तर टाळले किंवा विचारपूर्वक विधाने केली. थेट शिंदेंवर का बोलत नाही, असे चव्हाण यांना माध्यमांनी विचारले की, खासगीत शिंदे हे आमचेच असून, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय असल्याचे ते हसत सांगत.सरसंघचालक मोहन भागवत काही महिन्यांपूर्वी ठाण्यात आले असताना शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमात त्यांची  आवर्जून भेट घेतली व भागवतांचा सत्कारही केला होता. भाजप, संघ परिवाराशी त्यांनी नाते घट्ट ठेवले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या यशाकरिता डोंबिवली, कल्याण, कल्याण ग्रामीण तसेच उल्हासनगर भागांतील संघाच्या मंडळींशी संपर्क करून देण्याकरिता चव्हाण यांनी मदत केली होती. याचा उल्लेख शिंदे, चव्हाण हे वेळोवेळी जाहीर कार्यक्रमांत आवर्जून करीत. ऑपरेशन लोटसमध्ये चव्हाण हे शिंदे यांच्यासोबत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारच्या भाजप जल्लोषातही ते विधानभवन परिसरात नव्हते, त्यावेळी चव्हाण समर्थकांनी ते एका मोहिमेवर असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. 

अनेक वर्षे जपली मैत्री     कल्याण-डोंबिवली महापालिकेने कचऱ्यावर लावलेल्या करासंदर्भात आंदोलन करण्याची घोषणा चव्हाण यांनी केली होती.     त्या वेळी शिंदेंकडून चर्चेने समस्या सोडवू, असा प्रस्ताव आल्यावर चव्हाण यांनी रातोरात आंदोलन स्थगित केले होते.     त्यानंतर त्या दोघांची या विषयावर भेट, चर्चा झाली नाही; पण त्यावेळीदेखील मैत्री उघड झाली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा