शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

शिवसेनेच्या 'वैद्यकीय मदत मार्गदर्शक' ग्रंथाचे प्रकाशन, उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 9:47 PM

राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारला ग्रंथ

ठाणे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते "वैद्यकीय मदत मार्गदर्शक" ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. शहरातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा ग्रंथ प्रकाशनसोहळा पार पडला. आरोग्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनात खा.डॉ.श्रीकांत शिंदे आणि मंगेश चिवटे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या सहकार्याने माहिती संपादित करून हा ग्रंथ साकारला आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या समाजभिमुख राजकारणाचा वसा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाजकारणाचा वारसा ठाण्यात एकनाथ शिंदे समर्थपणे पुढे नेत आहेत, असे यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटले. "वैद्यकीय मदत मार्गदर्शक" ग्रंथ समाजातील गोरगरीब गरजू रुग्णांसाठी दिशादर्शक आणि उपयुक्त ग्रंथ ठरेल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. "वैद्यकीय मदत मार्गदर्शक" या ग्रंथासाठी मेहनत घेतलेल्या खा.डॉ.श्रीकांत शिंदे आणि मंगेश चिवटे यांचेही उद्धव ठाकरेंनी विशेष अभिनंदन केले. 

तर आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या समाजसेवकांसाठी तसेच नव्याने या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, संस्था, गोरगरीब गरजू रुग्ण किंबहुना समाजातील प्रत्येक घटकासाठी "वैद्यकीय मदत मार्गदर्शक" हा ग्रंथ दिपस्तंभ ठरेल अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या. तसेच शिवसेना वैद्यकीय मदत मार्गदर्शक ग्रंथाचे संपादन केलेल्या खा डॉ. श्रीकांत शिंदे आणि मंगेश चिवटे यांच्या आरोग्य विषयक उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. खा.डॉ.श्रीकांत शिंदे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी वर्षभराच्या परिश्रमानंतर "वैद्यकीय मदत मार्गदर्शक" ग्रंथ साकारला असुन या ग्रंथात गोरगरीब गरजू रुग्णांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि विविध ट्रस्ट कडून आर्थिक मदत कशी मिळविता येईल यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

काय आहे शिवसेना वैद्यकीय मदत मार्गदर्शक या ग्रंथात?

1) राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालये (चॅरिटी हॉस्पिटल्स )2) राज्यातील सर्व महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत असलेली रुग्णालये,3) राज्यातील सर्व रक्त पेढ्या(ब्लॅक बँक)4) गोरगरीब गरजु रुग्णांना मदत करणार्या ट्रस्टची यादी.5) राज्यातील सर्व धर्मशाळा यांची यादी.6) राज्यातील सर्व अनाथ आश्रमे व बालकाश्रम़ाची यादी.7) गरजु रुग्णांनी प्रधानमंत्री सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्ज कसा दाखल करावा त्याची संक्षिप्त माहिती.8) त्याचबरोबर सिद्धिविनायक ट्रस्ट आणि देणगी देणाऱ्या विविध ट्रस्ट कडे आर्थिक मदत मिळवण्यासाठी अर्ज कसा दाखल करावा त्याची संक्षिप्त माहिती.9) केंद्र शासन व राज्य शासनाच्या आरोग्य विषयी विविध योजनांची माहिती.10) राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाची ( सिव्हिल हॉस्पिटल्स) / जिल्हा शल्यचिकित्सक यांची माहिती व संपर्क क्रमांक. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाthaneठाणे