Eknath Khadse's warm welcome from Ulhasnagar NCP | उल्हासनगर राष्ट्रवादी कडून एकनाथ खडसे यांचे जंगी स्वागत

उल्हासनगर राष्ट्रवादी कडून एकनाथ खडसे यांचे जंगी स्वागत

उल्हासनगर : राष्ट्रवादी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षा किरण धामी कौर, पक्षाचे गटनेता भरत गंगोत्री, युवानेते विकास खरात यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शीळ फाटा येथून जाणाऱ्या एकनाथ खडसे यांचे जंगी स्वागत केले. तसेच त्यांना साई झुलेलाल यांची प्रतिमा देऊन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

उल्हासनगरात कलानी कुटुंबासह सहकार्यांनी भाजपात प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष प्रवेश केल्यानंतर, शहर राष्ट्रवादी पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले होते. मात्र भरत गंगोत्री यांनी पक्षाचे अस्तित्व कायम ठेवून महापालिकेत पक्षाचे ४ नगरसेवक निवडून आणले. पक्षाची एकनिष्ठ असलेल्या गंगोत्री यांना उल्हासनगर विधानसभेची उमेदवारी वरिष्ठ नेत्यांनी दिली. तसेच पक्षाच्या विद्यमान आमदार ज्योती कलानी यांना तिकीट दिल्याचे जाहीर केल्यावर माघार घेतली. पक्षाने त्यांच्यावर प्रदेश सचिवाची जबाबदारी सोपविली असून त्यांनी शहरभर पक्षाचे जनसंपर्क कार्यालय उघडण्याचा धडाका सुरू केला. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशामुळे पक्षाला बळ येऊन खानदेश मध्ये पक्ष मजबूत होणार असल्याची प्रतिक्रिया गंगोत्री यांनी पत्रकार यांच्या सोबत बोलताना दिली आहे.

 राष्ट्रवादी पक्षाचे नेते एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांच्यासह पक्ष पदाधिकारी शनिवारी सकाळी शीळ फाटा कल्याण येथून जाणार असल्याची माहिती भरत गंगोत्री याना मिळाल्यावर त्यांनी पक्ष पदाधिकार्यासह शीळ फाटा गाठले. पक्षांच्या शहर जिल्हाध्यक्षा किरण धामी कौर, गटनेते भरत गंगोत्री, विकास खरात, पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी यांनी एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांचे जंगी स्वागत केले. तसेच उल्हासनगर येण्याचे आमंत्रण गंगोत्री यांनी देऊन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Eknath Khadse's warm welcome from Ulhasnagar NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.