Eknath Khadse was welcomed by Bhiwandi traffic police | भिवंडीत वाहतूक पोलिसांनी केले एकनाथ खडसेंचे स्वागत

भिवंडीत वाहतूक पोलिसांनी केले एकनाथ खडसेंचे स्वागत

नितिन पंडीत - 

भिवंडी :  भाजपाला अखेरचा राम राम करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री एकनाथ खड़से हे मुंबई येथून मुक्ताईनगर येथील आपल्या मतदारसंघात शनिवारी परत जात असतांना भिवंडीतील मुंबई - नाशिक महामार्गावरील रांजणोली बायपास येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे एकनाथ खडसेंच्या  राष्ट्रवादीतील  इंट्रीने वाहतूक पोलिसांनी देखील स्वागत करीत त्यांना पुष्पगुछ दिले.

यावेळी राष्ट्रवादीचे भिवंडी शहराध्यक्ष भगवान टावरे, कल्याण जिल्हा राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सुधीर भाऊ वंडार पाटील , यांच्यासह उल्हासनगर येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मानकोली नाका या ठिकाणी जय आगरी सेवा संस्था ,शेतकरी संघटना पदाधिकारी यांनी ही एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे स्वागत केले.

 

Web Title: Eknath Khadse was welcomed by Bhiwandi traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.