टीएमटीच्या वागळे डेपोच्या लिफ्टमध्ये अडकले आठ टिसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 17:18 IST2019-11-02T17:14:10+5:302019-11-02T17:18:55+5:30
सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नसली तरी या सर्वाना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

टीएमटीच्या वागळे डेपोच्या लिफ्टमध्ये अडकले आठ टिसी
ठाणे - ठाणे परिवहनच्या वागळे इस्टेट डेपोमध्ये लिफ्ट मध्ये आठ तिकीट तपासणीस अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या लिफ्टची क्षमता चारची असताना त्यात आठजण शिरल्याने ही लिफ्ट बंद पाडल्याची बाब समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नसली तरी या सर्वाना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली. वास्तविक पाहता मागील कित्येक वर्षापासून वागळे डेपोतील लिफ्ट बंद अवस्थेत होती. त्यामुळे तीन तीन मजले पायी जातांना अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांचे हाल होत होते. खासकरुन महिलांचेही हाल होत होते. अखेर या संदर्भात वाचा फोडल्यानंतर अखेर सहा महिन्यापूर्वी नवीन लिफ्ट बसविण्यात आली. या लिफ्टची क्षमता चार जणांची आहे. परंतु शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास या लिफ्टमध्ये एक नाही, दोन नाही तर तब्बल 8 तिकीट तपासणीस शिरले. यावेळी लिफ्टचा दरवाजा बंद झाला खरा, परंतु क्षमता जास्त असल्याने ही लिफ्ट वर जाऊ शकली नाही. शिवाय त्याचे दारही उघडू शकले नाही. 15 मिनिटे हा खेळ सुरु होता. अखेर सुरक्षा रक्षकाने चावी आणून दरवाजा उघडला आणि सर्व तिकीट तपासणीस सुखरुप बाहेर काढण्यात आले.