शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटााला प्रत्युत्तर 
4
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
5
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
6
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
7
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
8
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
9
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
10
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
11
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
12
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
13
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
14
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
15
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
16
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
17
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
18
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
19
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
20
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 

ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी आठ जणांचा मृत्यू , ४७१ रुग्ण नवे रुग्ण  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 3:41 AM

CoronaVirus News in Thane : ठाणे शहरात १४४ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ६० हजार ७४५ झाली आहे. शहरात एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या एक हजार ३७८ झाली.

ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ४७१ रुग्ण आढळल्याने आता दोन लाख ५९ हजार ६६८ रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार २२७ झाली आहे.ठाणे शहरात १४४ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ६० हजार ७४५ झाली आहे. शहरात एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या एक हजार ३७८ झाली. कल्याण- डोंबिवलीत १४५ रुग्णांची वाढ झाली असून, तीन मृत्यू आहेत. आता ६१ हजार ६८९ रुग्ण बाधित असून, एक हजार १८६ मृत्यूंची नोंंद आहे.उल्हासनगरमध्ये नऊ रुग्ण सापडले असून, एकाचा मृत्यू आहे. येथील बाधितांची संख्या ११ हजार ७२९, तर ३७० मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीला तीन बाधित आढळून आले असून, एकही मृत्यू नाही. आता बाधित सहा हजार ७५० असून, मृतांची संख्या ३५४ कायम आहे. मीरा- भाईंदरमध्ये १८ रुग्ण आढळले असून, एक मृत्यू आहे. या शहरात बाधितांची संख्या २६ हजार ६६५ असून, मृतांची संख्या ८०२ झाली आहे.अंबरनाथमध्ये १० रुग्ण आढळले असून, एकही मृत्यू नाही. येथे बाधित आठ हजार ६८१ असून, मृत्यू ३१४ कायम आहेत. बदलापूरमध्ये १२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित नऊ हजार ६२५ झाले आहेत. या शहरातही मृत्यू न झाल्यामुळे मृत्यूची संख्या १२५ कायम आहे. ग्रामीणमध्ये २१ रुग्णांची वाढ झाली असून, एकही मृत्यू नाही, तर बाधित १९ हजार ३९६ झाले असून, आतापर्यंत ५९२ मृत्यू नोंदले आहेत.

वसई -विरारमध्ये १७ नवे काेराेना रुग्णवसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीत शुक्रवारी दिवसभरात १७ रुग्ण नव्याने आढळले असून शुक्रवारी रुग्णालयातून १२ रुग्ण मुक्त झाले. तर दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आता शहरांत अजूनही २१० रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मागील आठवड्यात कोरोना आटोक्यात होते. मात्र, आता पुन्हा रुग्ण वाढत आसल्यामुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची तसेच महापालिका प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलणे आवश्यक झाले आहे. 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस