केडीएमसीने जप्त केल्या आठ हातगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:48 IST2021-02-17T04:48:24+5:302021-02-17T04:48:24+5:30

कल्याण : कल्याण पश्चिमेतील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याची कारवाई महापालिकेच्या कारवाई पथकाने केली. या कारवाईत आठ हातगाड्या जप्त केल्या आहेत. ...

Eight handcarts seized by KDMC | केडीएमसीने जप्त केल्या आठ हातगाड्या

केडीएमसीने जप्त केल्या आठ हातगाड्या

कल्याण : कल्याण पश्चिमेतील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याची कारवाई महापालिकेच्या कारवाई पथकाने केली. या कारवाईत आठ हातगाड्या जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर पाच सिलिंडरसह दुकानाबाहेर ठेवण्यात आलेले साहित्यही जप्त केले आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते यांनी ही कारवाई केली. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, महापालिकेच्या मुख्यालयासमोर असलेली धोकादायक मुस्तफा मंजिल ही इमारत पाडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी महापालिकेने हाय रीप जॉ मशीन कंत्राटदारामार्फत घेतले आहे. या चारमजली धोकादायक इमारतीला पाडण्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. या मशीनच्या साहाय्याने अन्य प्रभागातील धोकादायक इमारती आणि बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात येतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Web Title: Eight handcarts seized by KDMC