शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

पाच महिन्यांपासून साडेआठ हजार होमगार्ड मानधनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 11:50 PM

५० वर्षे वय झाल्याने कोरोनामुळे काम मिळेना : चिंतेचे वातावरण

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनामुळे गेली अनेक महिने लॉकडाऊन होते. त्यामुळे गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) अनेक जवानांना वयाच्या बंधनामुळे घरीच बसावे लागले. आता ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली तरीही ५०पेक्षा अधिक वयोगटांतील होमगार्डला बंदोबस्त मिळत नाही. शिवाय गेली पाच महिने त्यांना मानधन मिळाले नसल्याने काम आणि मानधनाअभावी आपले घर कसे चालवायचे याच, चिंतेत होमगार्डच्या महिला आणि पुरुष कर्मचारी आहेत.ठाणे जिल्ह्यातील होमगार्डच्या जवानांचे गेली अनेक महिने मानधन थकीत आहे. यात काहींचे फेब्रुवारी २०२०पासून तर काहींची ऑक्टोबर २०२० पासून थकबाकी आहे. होमगार्डची सेवा नोकरी म्हणून न स्वीकारता समाजसेवा म्हणून तिचा स्वीकार केला जावा, असा दावा होमगार्डच्या वरिष्ठ कार्यालयातून केला जातो. परंतु, याच सेवेत गेली अनेक वर्षे काम केल्यानंतर अचानक अनेकांना घरी राहण्याचे आदेश दिले गेले. काहींना केवळ कोरोनामुळे ५० वर्षांपेक्षा जास्त वय झाल्यामुळे आरोग्याच्या कारणास्तव काम नाकारले आहे. परंतु, पोलीस आणि इतर खात्यातील कर्मचारी जर चांगल्याप्रकारे नोकरी करीत असतील तर मग केवळ होमगार्डच्या जवानांनीच काय केले आहे? मानधन थोडे उशिरा मिळाले तरी चालेल पण एकदम कामावरून काढू नका? अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.ठाणे जिल्ह्यात साडेआठ हजारांच्या घरात या जवानांची संख्या असून, यातील अनेकांना रेल्वे, वाहतूक तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांच्या बरोबरीने बंदोबस्त दिला जातो. कोरोना काळातही पोलिसांच्या बरोबरीने त्यांनी चांगल्याप्रकारे आपले कर्तव्य बजावले, मग तरीही हा विभाग दुर्लक्षित का? असा सवाल त्यांनी केला आहे.महिन्याला किती मिळते काम?अनेक होमगार्डच्या जवानांचे वर्षभरापासूनचे मानधन थकले आहे. दिवसाला ६७० रुपये त्यांना मानधन मिळते. सलग महिनाभर काम किंवा बंदोबस्त मिळाल्यास ते सुमारे २० हजारांच्या आसपास मानधन जाते. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून कामही आणि मानधनही नाही, अशी अवस्था या जवानांची आहे.

जिल्हा समादेशक काय म्हणतात...होमगार्डच्या जवानांचे मानधन काही कारणास्तव थकले आहे. परंतु, ते त्यांना लवकर मिळण्यासाठी आता प्रक्रिया सुरू आहे. मुख्यालयात त्यांची बिले मंजुरीसाठी पाठविली आहेत. त्यामुळे मानधनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. दुसरीकडे कोरोनामुळे वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या होमगार्ड कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप केले जाऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत. ५० वयोगटांतील होमगार्डलाही काम मिळण्यासाठी मुख्यालयात पाठपुरावा केला जाईल.        - स्मिता पाटील,     जिल्हा समादेशक, ठाणे