रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 06:19 IST2025-09-19T06:17:22+5:302025-09-19T06:19:42+5:30
तसेच सूर्यग्रहणाच्या वेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. अशा वेळी सूर्याची तेजस्वी गोलाकार कडा (कंकणासारखी) दिसते.

रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
ठाणे : येत्या रविवारी २१ सप्टेंबर रोजी भाद्रपद अमावास्येच्या दिवशी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. हे ग्रहण ओसेनिया, अंटार्क्टिका आणि दक्षिण ध्रुव प्रदेशातील भागातून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
सोमण म्हणाले की, सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्रबिंब ८५ टक्के सूर्यबिंबाला झाकून टाकणार आहे. हे सूर्यग्रहण १५४ सरॉस ग्रहणचक्रातील या आहे. सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत. खंडग्रास सूर्यग्रहणावेळी सूर्यबिंबाचा थोडा भाग चंद्रबिंबाद्वारे झाकला जातो, खग्रास सूर्यग्रहण म्हणजे ज्यावेळी चंद्रबिंबामुळे संपूर्ण सूर्यबिंब झाकले जाते.
तसेच सूर्यग्रहणाच्या वेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. अशा वेळी सूर्याची तेजस्वी गोलाकार कडा (कंकणासारखी) दिसते. त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहावयाचे नसते. तसे पाहिल्यास दृष्टीस इजा होते. सूर्यग्रहण हे पाहावयाचे असते. ग्रहणचष्यातूनच
आगामी काळात होणारी विविध सूर्यग्रहणे
कंकणाकृती सूर्यग्रहण
१७ फेब्रुवारी २०२६
खग्रास सूर्यग्रहण
१२ ऑगस्ट २०२६
कंकणाकृती सूर्यग्रहण
६ फेब्रुवारी २०२७
खग्रास सूर्यग्रहण
२ ऑगस्ट २०२७
२०२७ मध्ये संधी
भारतातून दिसणारे यापुढील सूर्यग्रहण २ ऑगस्ट २०२७ रोजी होणार असल्याचे सोमण यांनी सांगितले. ते जरी खग्रास सूर्यग्रहण असले तरी भारतातून ते खंडग्रास स्थितीत दिसणार असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले.
कंकणाकृती सूर्यग्रहण
२६ जानेवारी २०२८
खग्रास सूर्यग्रहण
२२ जुलै २०२८
खंडग्रास सूर्यग्रहण
१४ जानेवारी २०२९
खंडग्रास सूर्यग्रहण
१२ जून २०२९
खंडग्रास सूर्यग्रहण
११ जुलै २०२९
खंडग्रास सूर्यग्रहण
५ डिसेंबर २०२९