रायगडच्या भूकंपाचे कल्याण - उल्हासनगरला धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 07:36 PM2018-07-14T19:36:16+5:302018-07-14T19:44:52+5:30

पाऊस सुरू असतानाच भूगर्भात आवाज होऊन काही नागरिकांना हादरे बसले. रात्री उशिरापर्यंत या भूकंपाचा केंद्र बिंदू शोधणे शक्य झाले नाही. मात्र या भूकंपाची खात्री करून घेण्यासाठी दिल्ली येथील भूकंप दर्शक विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी या भूकंपास दुजोरा दिला

The earthquake of Raigad in Kalyan - Ulhasnagar | रायगडच्या भूकंपाचे कल्याण - उल्हासनगरला धक्के

रायगड जिल्ह्यात २.८ रिस्टरस्केलचा भूकंप

Next
ठळक मुद्दे रायगड जिल्ह्यात २.८ रिस्टरस्केलचा भूकंप शुक्रवारी रात्री ९.२१ मिनीटांनी झालाभूकंपाचे सौम्य धक्के ठाणे जिल्ह्यातील कल्याण,डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळा परिसरातील नागरिकांना जाणवले२.८ रिस्टरस्केल असलेला भूकंप महाराष्ट्र  रायगड जिल्ह्यात झाल्याचे दिल्ली येथील भूकंप दर्शक विभागातील एस. आर.पॉल यांनी लोकमतला सांगितले


ठाणे : रायगड जिल्ह्यात २.८ रिस्टरस्केलचा भूकंप शुक्रवारी रात्री ९.२१ मिनीटांनी झाला.या भूकंपाचे सौम्य धक्के ठाणे जिल्ह्यातील कल्याण,डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळा परिसरातील नागरिकांना जाणवले. यामुळे ऐन पावसात रहिवाशी भेदरलेल्या आवस्थेत घर सोडून रस्त्यावर आले. काय झाल्याचे कळत नव्हते. व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेजमुळे आणखीच खबराट निर्माण झाली. आज शनिवारी दिवसभर सर्वत्र भूकंपाची चर्चा जिल्ह्यात ऐकायला मिळाली. पाऊस सुरू असतानाच भूगर्भात आवाज होऊन काही नागरिकांना हादरे बसले. रात्री उशिरापर्यंत या भूकंपाचा केंद्र बिंदू शोधणे शक्य झाले नाही. मात्र या भूकंपाची खात्री करून घेण्यासाठी दिल्ली येथील भूकंप दर्शक विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी या भूकंपास दुजोरा दिला. २.८ रिस्टरस्केल असलेला भूकंप महाराष्ट्र  रायगड जिल्ह्यात झाल्याचे दिल्ली येथील भूकंप दर्शक विभागातील एस. आर.पॉल यांनी लोकमतला सांगितले. रायगडमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे पॉल यांनी स्पष्ट केले.

Web Title: The earthquake of Raigad in Kalyan - Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.