शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ई-कचरा प्रक्रिया: दोन कंपन्यांच्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:39 IST

मेपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता

- मुरलीधर भवारकल्याण : कचऱ्यापासून खत, बायोगॅस आणि वीजनिर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यासाठी केडीएमसीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचबरोबर ई-कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी राबवलेल्या निविदेस दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेला जागा व शेड उभारण्याव्यतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. दोनपैकी एका कंपनीला काम दिल्यावर प्रकल्प मे महिन्याच्या अखेरपर्यंत कार्यान्वित होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.महापालिका हद्दीतून दररोज ६४० मेट्रीक टन कचरा गोळा होतो. त्यापैकी ७० मेट्रीक टन कचरा हा २७ गावांतील आहे. महापालिकेच्या हद्दीतून गोळा होणाºया एकूण कचºयापैकी १० टक्के कचरा हा ई-कचरा असतो. परंतु, त्यावर शास्त्रोक्त प्रक्रियाच केली जात नाही. या कचºयाचे शास्त्रोक्त विघटन व प्रक्रिया न झाल्यास त्यापासून असाध्य रोग नागरिकांना होऊ शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांना कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची सक्ती केली आहे. महापालिका कचरा विघटन व प्रक्रिया व्यवस्थापनासाठी प्रयत्नशील असल्या तरी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील एकाही महापालिका व पालिकेने ई-कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारलेला नाही. केडीएमसीने आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी कंत्राट दिले आहे. त्याचबरोबर उंबर्डे व बारावे येथे घनकचरा प्रकल्प, १३ ठिकाणी कचºयापासून बायोगॅस आणि वीज तयार करणार आहे.पर्यावरण प्रदूषण नियंत्रणासाठी नव्या नियमावलीनुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव यांनी केडीएमसीला ६ डिसेंबर २०१८ रोजी नोटीस पाठवून ई-कचरा प्रकल्प राबविण्याविषयी कृती आराखडा सादर करण्याची सूचना केली होती. महापालिकेने १७ डिसेंबरला ही नोटीस मिळताच ई-कचरा व्यवस्थापन व प्रकल्पासंदर्भात कृती आराखडा तयार करून तो मंडळाकडे सादर केला. त्यात महापालिकेने म्हटले आहे की, ई-कचºयावर जानेवारीमध्ये ‘एक्सप्रेशन आॅफ इंटरेस्ट’ तत्त्वावर निविदा मागवण्यात आल्या. त्यास नवी मुंबईतील ‘युनायटेड इंडस्ट्रीज’ व डोंबिवलीतील ‘रेस्पोज’ या कंपनीने प्रतिसाद दिला आहे. या प्रकल्पाचे काम एकाच कंपनीला दिले जाणार आहे. प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेला कंपनीला जागा आणि पाच हजार चौरस फुटांची कचरा शेड उभारून द्यावी लागेल. वर्षाला ५०० मेट्रीक टन ई-कचºयावर प्रक्रिया तेथे होऊ शकते. प्रकल्प उभारण्यासाठी कंपनीला दोन कोटी ८९ लाखांचा खर्च अपेक्षित असून, तो करण्याची तयारी कंपन्यांनी दर्शवली आहे. त्याचबरोबर डोंबिवलीतील रामनगर व दत्तनगर येथे कचरा शेड उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर, मार्चपर्यंत कल्याणमधील बारावे, लोकग्राम आणि रामबागेत येथे शेड उभारण्याचे काम पूर्ण होईल. हा प्रकल्प मे अखेरपर्यंत अस्तित्वात आल्यास ई-कचरा प्रकल्प राबविणारी केडीएमसी ही राज्यातील पहिली महापालिका ठरू शकते, असेही महापालिकेने आराखड्यात म्हटले आहे.ई. रवींद्रन यांनी घेतला होता पुढाकारई-कचरा प्रकल्पासाठी तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी २०१५ मध्ये प्रयत्न केले होते. मात्र, त्याच्या बदलीनंतर पुढे काहीच हालचाल झाली नाही.मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठविल्यावर या प्रकल्पासाठी निविदा काढण्याची जाग महापालिकेस आली. तेव्हा महापालिकेची धावपळ सुरू झाली.‘व्हिजन डोंबिवली’ प्रकल्प राबविणारे डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी यापूर्वी ई-कचरा गोळा करण्यासाठी दोनदा मोहीम हाती घेतली होती. त्याला डोंबिवलीत चांगला प्रतिसाद मिळाला होता.

टॅग्स :kalyanकल्याण