शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘ई’ प्रभाग कार्यालयात दिला ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 00:39 IST

प्रभाग समितीची सभा सुरू असताना महिलांबरोबर सभापतींनीही ठिय्या धरला

कल्याण : पाणीटंचाईमुळे त्रस्त असलेल्या केडीएमसीच्या २७ गावांतील महिलांनी शुक्रवारी ई प्रभाग कार्यालयावर धाव घेतली. यावेळी तेथे प्रभाग समितीची सभा सुरू असताना महिलांबरोबर सभापतींनीही ठिय्या धरला. अधिकारी सभेला गैरहजर राहिल्याने नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना त्यांनी एक तास प्रवेशद्वाराजवळच रोखून धरले. अखेरीस उपायुक्त आल्यानंतर नगरसेवकांनी ठिय्या मागे घेतला.ई प्रभाग समितीची सभा चार महिन्यांनंतर शुक्रवारी होती. यावेळी प्रभाग अधिकारी रवींद्र गायकवाड उपस्थित नव्हते. त्यामुळे प्रभाग समितीच्या सभापती पूजा म्हात्रे, प्रमिला पाटील, सुनीता पाटील, प्रभाकर जाधव, प्रेमा म्हात्रे, रूपाली म्हात्रे आदी १२ नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन सुुरू केले. याचवेळी पाणीसमस्येने त्रस्त असलेल्या महिलांनी प्रभागात धाव घेतली होती. या महिलांसह प्रभाग समिती सदस्य व सभापतींनी ठिय्या आंदोलन सुरू केले.नगरसेवक प्रभाकर जाधव यांनी सांगितले की, नागरिकांना पाणी मिळत नाही. रस्त्यांवरील खड्डे बुजवले गेले नाहीत. गणेशोत्सव जवळ आला आहे. नागरिकांचे हाल कुत्रे खात नाही. अधिकारी जर गावात आले, तर लोक त्यांना चपलेने मारतील. प्रभाग समितीच्या सभेला अधिकारी दाद देत नाही. नागरिक प्रभाग समितीत येऊन जाब विचारतात. योग्य उत्तरे त्यांना दिली जात नाही. सभेला प्रभाग अधिकारीच नाही. सक्षम अधिकारी नसल्याने प्रशासनाच्या वतीने उत्तरे कोण देणार.आयुक्तांनी दोनच दिवसांपूर्वी नांदिवली परिसराचा दौरा केला, तेव्हा अधिकारीवर्गाची कानउघाडणी केली होती. लोकांच्या समस्या न सोडवता काय झोपा काढता का, असा संतप्त सवाल आयुक्तांनीच उपस्थित केला होता. त्यानंतर, शुक्रवारी पुन्हा अधिकाºयांच्या निर्ढावलेल्या वृत्तीचा प्रत्यय ई प्रभाग कार्यालयाशी संलग्न असलेल्या २७ गावांमधील नगरसेवकांना आला. त्यामुळे महिलांनी प्रभाग कार्यालयात चक्क गोंधळ घातला. सभापतींनीही त्याला जोरदार समर्थन दिले.अधिकाºयांवर करणार कारवाई; उपायुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागेनगरसेवकांच्या गोंधळानंतर प्रभाग अधिकारी रवींद्र गायकवाड कार्यालयात आले, तेव्हा त्यांना कार्यालयात न घेता प्रवेशद्वारावर ताटकळत रोखून धरले गेले. उशिरा येणाºया अधिकाºयांवर काय कार्यवाही करणार, असा सवाल नगरसेवकांनी केला.अखेरीस उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी ई प्रभाग कार्यालय गाठले. संतप्त झालेल्या नगरसेवकांची त्यांनी समजूत काढत गैरहजर राहणाºया अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यावर नगरसेवकांनी तीन तासांनंतर आंदोलन मागे घेतले.

 

टॅग्स :thaneठाणेagitationआंदोलनwater scarcityपाणी टंचाई