भातसा नदीत बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 01:24 IST2019-01-20T01:24:33+5:302019-01-20T01:24:35+5:30

वासिंद येथील न्यू आयडी हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणारा यश रवींद्र सुरु वतकर (१४) मित्रांसोबत शनिवारी दुपारी भातसा नदीवर पोहायला गेला होता.

Dying in the river Bhatsa, the death of a schoolgirl | भातसा नदीत बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

भातसा नदीत बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

टिटवाळा : वासिंद येथील न्यू आयडी हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणारा यश रवींद्र सुरु वतकर (१४) मित्रांसोबत शनिवारी दुपारी भातसा नदीवर पोहायला गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीपात्रात बुडाला. त्याचा मृतदेह सायंकाळी ५ च्या सुमारास आढळल्याचे सूत्रांनी सांगितले.
यश हा वासिंद पूर्वेतील रहिवासी आहे. तो मित्रांसह शनिवारी भातसा नदीत पोहायला गेला. मात्र, तो बुडाल्यानंतर घाबरलेले मित्र तेथून निघून गेले. त्यांनी यशच्या नातेवाइकांना घडलेला प्रकार सांगितला.
याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी नातेवाईक व पोलीस दाखल झाले. दरम्यान, यशचा मृतदेह नदीतून बाहेर काढून वासिंद येथील शासकीय रु ग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याबाबत. टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र अहिरराव अधिक तपास करत आहेत.

Web Title: Dying in the river Bhatsa, the death of a schoolgirl