शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
4
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
5
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
6
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
7
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
8
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
9
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
10
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
11
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
12
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
13
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
14
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
15
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
16
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
17
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
18
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
19
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
20
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका

संचारबंदीच्या काळात गेल्या चार दिवसात ८७३ वाहने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 17:05 IST

ठाणे जिल्हयात शहरी भागासह ग्रामीण भागात झपाटयाने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात जमावबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणारे आणि कोरोनाचा चाचणी अहवाल नसणारे अशी ८७३ वाहने ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जप्त केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचे नियम तोडणाऱ्या तीन हजार ९१८ चालकांवर कारवाई वाहतूक शाखेने उगारला कारवाईचा बडगा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे जिल्हयात शहरी भागासह ग्रामीण भागात झपाटयाने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात जमावबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणारे आणि कोरोनाचा चाचणी अहवाल नसणारे अशी ८७३ वाहने ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जप्त केली आहे. त्याचबरोबर कोरोनासंबंधी नियम तोडणाºया इतर तीन हजार ९१८ वाहन चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ठाणे जिल्ह्यातही संचारबंदी लागू केली आहे. बुधवारी लागू केलेल्या संचारबंदीच्या आदेशामध्ये सार्वजनिक वाहतूकीस परवानगी दिलेली आहे. मात्र, त्यासाठी वाहन चालकांकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र किंवा कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक आहे. तरच अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना वाहन घेऊन फिरता येऊ शकते, असे आदेशात स्पष्ट केले आहे. त्यानंतरही ठाणे ते बदलापूर यादरम्यान, अनेक वाहन चालक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळले आहे. ठाणे वाहतूक शाखेच्या १८ विभागांतर्गत केलेल्या नाकाबंदीमध्ये ही बाब स्पष्ट झाली. त्यामुळे शहरात विनाकारण फिरणाºया नागरिकांवर तसेच रिक्षा चालक किंवा बसमधून प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत होते. त्यानुसार १४ ते १८ एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत ठाणे शहर वाहतूक पोलीस आयुक्तालयात वाहतूक पोलिसांनी ८७३ वाहने जप्त केली आहेत. यामध्ये सर्वाधिक ४८० दुचाकींवर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्या खालोखाल २९६ रिक्षा, तर ९७ मोटारकारवर जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलिसांकडून महत्त्वाच्या चौकांमध्ये तपासणी केली जात होती. यामध्ये सर्वाधिक कारवाई दुचाकी आणि रिक्षांवर करण्यात आली आहे.* ठाणे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये १४ ते १८ एप्रिल या संचारदबंदीच्या कालावधीमध्ये नियम धुडकावणाºया तब्बल तीन हजार ९१८ वाहन चालकांवर कलम १७९ नुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये दुचाकीवर ट्रीपल सीट फिरणारे, वाहतूकीचे नियम मोडणाºया तसेच सीट बेल्ट न लावणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली आहे. यात भिवंडीमध्ये सर्वाधिक ४३७, नारपोलीमध्ये ४२६ तर कोनगावमध्ये ४१२ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.आपल्या कुटूंबाच्या आरोग्यासाठी नागरीकांनीही महत्त्वाच्या कामाशिवाय विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहनही वाहतूक शाखेने केले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस