शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

ठाण्यात आचारसंहिता काळात दोन हजार जणांवर कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: October 19, 2019 23:05 IST

निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पाचही परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्राती ६८ अट्टल गुन्हेगार तडीपार करण्यात आले आहेत. तर सात पिस्तुलांसह ४९ बेकायदेशीर हत्यारे हस्तगत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे४९ हत्यारे हस्तगत६८ अट्टल गुन्हेगार तडीपारएक कोटी पाच लाख ५६ हजार ४५० रुपयांची रोकड जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या महिनाभरात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत दोन हजार १० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई, तर ६८ अट्टल गुन्हेगारांना तडीपार केले असून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी १४ दखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय, १० तलवारींसह बेकायदेशीररीत्या बाळगलेली ४९ हत्यारेही जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.यात कलम १०७ नुसार १२३५ जणांवर, १०९ नुसार २५४ तर ११० नुसार ५२१ अशा दोन हजार १० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली, तर ६८ अट्टल गुन्हेगारांना ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरे या जिल्ह्यांमधून हद्दपार केले आहे. याव्यतिरिक्त ६५ जणांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव उपायुक्तांच्या कार्यालयात पाठविण्यात आले. आचारसंहिता २१ सप्टेंबर २०१९ पासून लागू झाल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांतील पोलीस ठाण्यांसह गुन्हे अन्वेषण विभागाच्या सर्व पथकांनी विशेष मोहीम राबवून या कारवाया केल्या.याशिवाय, बेकायदेशीर हत्यारे बाळगणा-यांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे दाखल केले असून यात सात पिस्तूल, नऊ गावठी कट्टे, दहा तलवारी, २२ चॉपर आणि ३६ काडतुसांचा समावेश आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून भरारी पथकांसह ठाणे पोलिसांनी एक कोटी पाच लाख ५६ हजार ४५० रुपयांची रोकड जप्त केली आहे. यात शांतीनगरमध्ये दोन लाखांची रोकड, कोनगावमध्ये तीन लाख ८५ हजार ८१० रुपये, मुंब्रा पोलिसांनी आठ लाख १० हजार रुपये, निजामपुरा दोन लाख ७४ हजार १४० रुपये, अंबरनाथ ९२ हजार ५०० रुपये, तर कासारवडवली पोलीस ठाण्यात अपक्ष उमेदवार रमेश कदम यांच्याकडून मिळालेल्या ५३ लाख ४६ हजारांच्या रोकडचा यामध्ये समावेश आहे.* दारूबंदीच्या २०४ कारवायायामध्ये दारूबंदीच्या सुमारे २०४ कारवायांमध्ये ८० हजार १६२ लीटर दारूसह तीन लाख ३६ हजार ६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमली पदार्थांच्या २४ कारवाया करून ९१ हजार ३०० चा सात किलो गांजा, तर पाच लाख ४५ हजार २३० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.* आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी १४ दखलपात्र, तर आठ अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये आठ गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धी झाली आहे. आर्म अ‍ॅक्टचे २६ गुन्हे दाखल असून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ नुसार १३ जणांविरुद्ध कारवाई केली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीElectionनिवडणूक