शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

अस्वच्छता करणाऱ्यांना दणका, वर्षभरात ५२ हजार नागरिकांकडून एक कोटींचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 03:57 IST

शहर अस्वच्छ करणा-यांकडून सफाईमार्शलच्या माध्यमातून मागील वर्षभरात जवळपास एक कोटी रु पयांचा दंड वसूल केला आहे. कचरा टाकणे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºया ५२ हजारांवर नागरिकांकडून तो वसूल केला आहे.

ठाणे - शहर अस्वच्छ करणाºयांकडून सफाईमार्शलच्या माध्यमातून मागील वर्षभरात जवळपास एक कोटी रु पयांचा दंड वसूल केला आहे. कचरा टाकणे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºया ५२ हजारांवर नागरिकांकडून तो वसूल केला आहे.गेल्या वर्षभरात दंडवसुलीला वेग आला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे त्यास गती नव्हती. सफाईमार्शलने आता कडक धोरण अवलंबून अस्वच्छता पसरवणाºयांवर करडी नजर ठेवली आहे. प्रत्येक ठिकाणी ५० ते ६० लोकांना पकडण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात मात्र १० ते १२ नागरिकच दंड भरत असल्याचे चित्र होते. काही नागरिक तर थेट राजकीय नेत्यांची नावे सांगून दंड भरण्यास नकार देत आहेत. मात्र, आता दंडवसुलीचे धोरण अधिक केल्याने वसुलीत वाढ झाली आहे.उघड्यावर शौचास बसणे, कचरा टाकणे, रस्त्यात थुंकणे अशा प्रकारे शहर अस्वच्छ करणाºयांवर २४५ सफाईमार्शलनी ही कारवाई केली. रेल्वेस्टेशन परिसर, बस डेपो, मार्केट येथे त्यांना तैनात केले आहे. वर्षभरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारे २७ हजार, थुंकणारे २२ हजार, तर इमारतींचे बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणाºया १५ हजार नागरिकांकडून हा दंड वसूल केला आहे.अशी आहे दंडाची रक्कमसार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे २०० रु पये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १००, सार्वजनिक ठिकाणी अंघोळ करणे १००, मूत्रविसर्जन १५०, प्राणी व पक्ष्यांना खाद्य भरवणे ५००, रस्त्याच्या कडेला शौचास बसणे १५०, व्यावसायिक वाहनांना रस्त्याच्या कडेला धुणे १०००, रस्त्याच्या कडेला कपडे व भांडी धुणे १००, अस्वच्छ परिसर आणि आवार १०,०००, इमारतीच्या पिण्याच्या पाइपलाइनमधील सांडपाण्याच्या पाइपलाइनमधील गळती आणि त्यामुळे इतरांना होणारा त्रास आणि सूचना दिल्यानंतरही १० दिवसांत दुरुस्ती न केल्यास १०,००० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.डोंबिवलीत स्वच्छता मोहीमडोंबिवली : अस्तित्व अपंग शाळा आणि केडीएमसी यांच्यातर्फे पूर्वेतील शेलारनाका, त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीत शनिवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शाळेच्या सचिव राधिका गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. स्वच्छता अभियानाचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर विजय घोडेकर हे उपस्थित होते.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे