शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

तीन दिवशीय संपामुळे ठाणे जिल्ह्यात १०० कोटींची वसुली रखडल्याचा फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 8:30 PM

शंभर कोटीं रूपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनात आले. यामध्ये प्रामुख्याने सेल टॅक्स विभागाचे दर दिवसाचे सुमारे २५ कोटी रूपयांच्या वसुलीचे काम बुडाले. तीन दिवसात ७५ कोटींच्या वसुलीस राज्य शासनास मुकावे लागल्याचे येथील नेत्यांच्या चर्चेतून उघड झाले. याप्रमाणेच आरटीओचे होणारे सुमारे १६ कोटींची वसुली तीन दिवसात बुडाली. तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाचे सुमारे साडे तीन कोटींची वसुली या संपाच्या कालावधीत बुडाली

ठळक मुद्देअभियांत्रिकी महाविद्यालयील प्राध्यापकांचा देखील या संपात सहभाग त्यांनी माणुसकीच्या नात्याने सेवा दिली. पालक मिटींग घेतली. विद्यार्थ्यांचे डेमो लेक्चर घेतलेशिक्षकांचा दोन दिवस सहभाग जाणला नाही. परंतु तिस-या दिवशी त्यांनी पाठिंबा दर्शवण्याचा प्रयत्न केला. पण मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळे त्याचा फज्ज्या उडाला.

सुरेश लोखंडेठाणे : शासनाच्या सर्व कार्यालयांमधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय तीन दिवशीय संपात सहभाग घेऊन एकजूट दाखवली. राज्य शासनाच्या सततच्या हेकेखोर ठाणे जिल्ह्यातील महसूल विभागासह आरटीओ, सेलटॅक्स आदी महत्वाच्या विभागांतील सुमारे शंभर कोटी रूपये वसुली रखडल्याचा आंदाज, या संपाचा मुळ केंद्रबिंदू ठरलेल्या येथील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर गव्हाळे यांनी सांगितले.या संपाच्या कालावधीत जिल्ह्यातील तीन प्रमुख कार्यालयाशी संपर्क साधून या तीन दिवसाच्या नुकसानीचा आंदाज घेतला. त्यात शंभर कोटीं रूपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनात आले. यामध्ये प्रामुख्याने सेल टॅक्स विभागाचे दर दिवसाचे सुमारे २५ कोटी रूपयांच्या वसुलीचे काम रखडले. तीन दिवसात ७५ कोटींच्या वसुली रखडली. याप्रमाणेच आरटीओची सुमारे १६ कोटींची वसुली रखडल्याचा तीन दिवसाचा  फटका  . तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाचे सुमारे साडे तीन कोटींची वसुली या संपाच्या कालावधीत रखडले आहे. उर्वरित अन्य काही कार्यालयांच्या छोठ्या मोठ्या रकमेच्या वसुलीचा विचार करता जिल्ह्यात शंभर कोटींचा अंदाज निश्चित करण्यात आला.जिल्ह्याभरातील सुमारे साडे चार हजार कर्मचा-यांनी या संपात सहभाग घेतला. प्रारंभ राजपत्रित अधिका-यांचा सहभागी असल्याचे कळताच कर्मचा-यांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण होते. परंतु त्यांनी या लढ्यातून माघार घेतल्यामुळे काहीसे तहबल झालेल्या संघटनेच्या नेत्यांनी पहिला दिवस यशस्वी केला आणि त्यानंतरचे पुढील दोन दिवस विना दिक्कत कर्मचा-यांचा प्रतिसाद मिळाल्याचे गव्हाळे यांच्यासह चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रदिप मोरे यांच्यासह प्राची चाचड, स्मिता टक्के यांनी सांगितले. अधिका-यांशिवाय हा लढा जिंकून मागण्या मंजूर करून घेतल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले.संपाच्या या तीन दिवसाच्या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नंतरची अस्थापना असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेने केवळ एक दिवस संपात सहभाग नोंदवला. तर जिल्हाधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभाग, नगररचना, शिधावाटप आदींमध्ये शुकशुकाट होता. अभियांत्रिकी महाविद्यालयील प्राध्यापकांचा देखील या संपात सहभाग होता. पण विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा कालावधी लक्षात घेऊन त्यांनी माणुसकीच्या नात्याने सेवा दिली. पालक मिटींग घेतली. विद्यार्थ्यांचे डेमो लेक्चर घेतले. एवऐच नव्हे तर व्दितीय व तृतिय वर्षाच्या पदवी व पदविका विद्यार्थ्यांचे तिन्ही दिवस लेक्टचर घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळले. मात्र या कालावधीत दुपारच्या सुटीत त्यांनी व्दारेसभा घेऊन संपातील सहभाग नोंदवला.जिल्ह्यातील बहुतांशी शिक्षकांचा या संपाला पाठिंबा मिळाला. पण जिल्ह्यातील शिक्षकांच्या दोन्ही मोठ्या संघटना भाजपा व सेनेच्या पाठबळाच्या असल्यामुळे त्यांच्या शिक्षकांचा दोन दिवस सहभाग जाणला नाही. परंतु तिस-या दिवशी त्यांनी पाठिंबा दर्शवण्याचा प्रयत्न केला. पण मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळे त्याचा फज्ज्या उडाला. खबरदारीची उपाययोजना म्हणून शिक्षण विभागाने शाळांना सुटी जाहीर केल्यामुळे त्यांच्या शेवटच्या दिवसाच्या पाठिंब्यावर पाणी फिरल्याचे आढळून आले.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी