डोंबिवली पश्चिमेला दिनदयाळ चौकात भाडे नाकारण्यावरुन प्रवासी रिक्षाचालकात झाले भांडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 19:30 IST2017-11-22T19:28:42+5:302017-11-22T19:30:20+5:30

Due to neglect of rent in Dardivali Chowk in Dombivli West | डोंबिवली पश्चिमेला दिनदयाळ चौकात भाडे नाकारण्यावरुन प्रवासी रिक्षाचालकात झाले भांडण

डोंबिवली पश्चिमेला दिनदयाळ चौकात भाडे नाकारण्यावरुन प्रवासी रिक्षाचालकात झाले भांडण

ठळक मुद्देयापुढे अशा रिक्षाचालकावर कारवाई झाल्यास रिक्षा युनियन जबाबदार नसेलगरोदर मातेचे भाडे नाकारल्याने पतीने विचारला जाब


डोंबिवली: गरोदर मातेचे भाडे नाकारल्याने पतीने जाब विचारल्याने एका रिक्षाचालकाशी भांडण झाल्याची घटना बुधवारी दुपारी डोंबिवली पश्चिमेला दिनदयाळ रोडवर घडली. या घटनेमुळे रिक्षा चालक मालक युनयिनने यापुढे कोणी भाडे नाकारल्यास त्यावर कारवाई झाली तर अशा घटनेशी रिक्षा युनियनचा काहीही संबंध राहणार नसल्याचा पवित्रा घेतला.
युनियनचे उपाध्यक्ष जोशी म्हणाले की, भाडे घेणे आवश्यक आहे. कोणालाही भाडे नाकारता येणार नाही. ते योग्य नाही. काही रिक्षाचालक असे कृत्य करतात, त्याचा त्रास प्रवाशांसह रिक्षा चालकांना होतो. ते योग्य नाही. त्यामुळे ठिकठिकाणी बोर्ड लावून यासंदर्भात जनजागृती केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे प्रवाशांना असा अनुभव आल्यास त्यांनी रितसर तक्रार द्यावी असे आवाहन जोशींनी केले.
------------

Web Title: Due to neglect of rent in Dardivali Chowk in Dombivli West