शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या शिस्तीमुळेच कर्तव्यदक्ष अधिकारी घडलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 01:41 IST

ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदापर्यंत यशस्वी पल्ला गाठणाऱ्या विवेक फणसळकर यांना आपटे या मुख्याध्यापकांनी दिला आयाम

ठाणे : पुण्याच्या महाराष्ट्रीयन मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलो. माध्यम इंग्रजी असले, तरी मराठी संस्कृती आणि सण शाळेत शिक्षकांकडून साजरे केले जात असत. शाळेचे संस्थाचालक शंकर ओगले आणि मुख्याध्यापक राजाराम विनायक आपटे यांनी विद्यार्थ्यांमध्ये कडक शिस्त लावली. याच शिस्तीमुळे आपण घडलो आणि आज या पदापर्यंत पोहोचलो आहोत, अशा शब्दांत ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शिक्षकांप्रति ऋण व्यक्त केले. शिक्षकांना रागवायचा, कान धरायचा आजही अधिकार आहे, असे ते सांगतात.कुमुदिनी पंंिडत या शिक्षिका हिंदी आणि मराठी शिकवायच्या. त्यांनी समाजकार्याचीही आवड निर्माण केली. नववीत असताना त्यांनी २०० मुलांच्या चमूला पांजरपोळ येथे नेले होते. शाळेने १९७३ ते १९८५ या काळात पुण्याजवळ विद्यार्थ्यांच्या परिश्रमातून धरण उभारले. आम्हीही धरणाच्या कामाला गेलो होतो. त्यावेळी जास्त जिलेबी कोण खाणार, अशी अनोखी पैज आपटेसरांनी लावली. महेंद्र हसभनीस याने ४१ जिलेब्या खाऊन बक्षीस मिळविले होते. शालेत आपटेसरांनी घडविलेले विद्यार्थी पुढे जीवनाच्या परीक्षेत कोणी नापास झाले नाही. सर्वांनाही बरोबर घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. त्यांनी अनेक चांगले संस्कार माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांवर रुजवले. त्यांचे ऋण हे कायम राहणार आहे.विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांची आवड रुजवली...संस्थाचालक राजाराम ओगले यांनी शाळेत विद्यार्थ्यांमध्ये शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वक्तृत्व, कला, क्रीडा यांचीही आवड रुजवली. या सर्वांमध्ये विद्यार्थी पारंगत असले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. त्यामुळे कला, क्रीडा आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये निपुणता येण्यासाठी विद्यार्थ्यांना ते घडवित असत.मुख्याध्यापक राजाराम आपटे हे पाचवी ते दहावीच्या वर्गांना शिकवायचे. प्रत्येक विद्यार्थ्याला ते वैयक्तिक ओळखत असत. हे त्यांचे वैशिष्ट्य होते. विद्यार्थ्यांच्या घरगुती अडचणीही त्यांना माहीत असत. यातूनच ते त्यांची काळजीही घ्यायचे. उन्हाळी सुटीच्या वेळी १९८० च्या दशकामध्ये दहावीच्या वर्गाचे गणित आणि शास्त्र या विषयांचे ते जादा क्लास घेत असत. त्यांची मूर्ती आणि आठवण आजही समोर आहे. कडक शिस्तीचे शिक्षक अशी त्यांची ख्याती होती.इंग्रजीवरचे प्रभुत्व त्यांचंच देणं...लि.म. अभ्यंकर हे त्यावेळी इंग्रजी विषय शिकवायचे. गणित, विज्ञान किंवा अभियांत्रिकी अशा वेगवेगळ््या क्षेत्रात जरी विद्यार्थ्यांनी भरारी घेतली, तरी त्यांना इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व आले पाहिजे, या मताचे ते होते. त्यामुळे इंग्रजीवरचे प्रभुत्व ही त्यांचीच देण असल्याची आठवणही त्यांनी सांगितली. शाळेत शिक्षक दिनाच्या समारंभात दहावीचे विद्यार्थी मुख्याध्यापकांसह शिक्षकाच्या भूमिकेत असायचे. या एका दिवसात संपूर्ण शाळेला विद्यार्थी हाताळायचे. यातूनच शिक्षकाचे महत्त्व कळायचे.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनTeacherशिक्षकthaneठाणे